पुणे मेट्रोची लोकोपायलट असलेल्या अपूर्वा आलटकर या मूळच्या साताऱ्याच्या असून यापूर्वी त्यांनी भारत फोर्ज मध्ये नोकरी केलेली आहे.त्यांनी आपले इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण करून मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि पायलट म्हणून रुजू झाल्या.
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! मेट्रोचा झाला विस्तार, किती असेल आता तिकीटाचा दर?
'मेट्रो चालवणे हा एक वेगळाच अनुभव आहे. आई वडिलांनासुद्धा खूप आनंद होत आहे. आपलं कौतुक होताना पाहून अभिमान वाटतोय. अनोळखी लोकांनी सुद्धा त्यांच्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून माझ्या कामाचं कौतुक केलेलं पाहून छान वाटलं. पुणे मेट्रो चालवणं ही एक महिला म्हणून माझ्यासाठी अभिमानाने मान उंचावणारी गोष्ट आहे,' अशी भावना अपूर्वानं व्यक्त केली.
advertisement
नाशिकच्या पल्लवी शेळकेचाही इथपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. नांदूर शिंगोटे या छोट्याशा खेड्यापासून पुणे मेट्रोची पायलट अशी त्यांनी मजल मारली आहे. त्यांना ड्रायव्हींगची आवड होती. संगमनेर येथील इंजीनियरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मेट्रोच्या ड्रायव्हिंगसाठी अप्लाय केले.
तुम्हाला माहितीये का? पुण्यात 1770 मध्ये संपूर्ण दगडात बांधण्यात आलं होतं हे मंदिर!
पहिल्यांदा मेट्रो चालवताना भीती होती. इतक्या प्रवाशांच्या जबाबदारीचं दडपण आलं होतं. पण, मी मेट्रो चालवताना पाहून आईला खूप आनंद झाला. माझ्याबद्दल सर्वजण अभिमानानं बोलतात, असं तिनं सांगितलं. त्यावेळी माझी छाती अभिमानानं भरुन आली, असं पल्लवीनं सांगितलं.
कोणत्याही गाडीच्या ड्रायव्हींगचा शून्य अनुभव असलेल्या शर्मीन आय्याज शेख यांनी आज मेट्रोचे स्टिअरींग हातात घेतलआहे. त्या पुण्यातील चाकणच्या रहिवाशी आहे. 'मेट्रो चालवताना सुरुवातीला भीती वाटली. इतक्या प्रवाशांना घेऊन मेट्रो चालवल्यानंतर स्वत:चा अभिमान वाटला,' असं शर्मीननं सांगितलं.