गेल्या काही महिन्यांपासून शंभर महिलांना मेट्रो चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. आता या महिला संपूर्ण आत्मविश्वासाने मेट्रोचे चाक हाती घेण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिवस-रात्र सुरक्षित, वेळेवर आणि कुशल सेवांचा अनुभव मिळणार आहे.
Pune News : नवीन कात्रज बोगद्यातून जाण्याचा विचार करताय? ही माहिती वाचल्याशिवाय पुढे जाणे टाळा
महिला चालक मेट्रो चालवतील हा निर्णय केवळ रोजगार निर्मितीचा नाही, तर महिलांच्या सुरक्षिततेलाही नवी दिशा देणारा आहे. रात्री उशिरा होणाऱ्या प्रवासासाठीही आता महिलांना दिलासा मिळणार आहे. एकाच वेळी 200 किमीच्या प्रवासाचा ताण, तांत्रिक हाताळणी आणि शिस्तबद्ध ड्रायव्हिंग या साऱ्याचे मोठे आव्हान महिला सामर्थ्याने पूर्ण करणार आहेत.
advertisement
परंपरेने पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत महिलांनी पाऊल टाकणे हा मोठा टप्पा मानला जात आहे. प्रशिक्षणादरम्यान महिलांनी केवळ गाड्या चालविण्याचेच नव्हे तर आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्याचे कौशल्यही आत्मसात केले आहे. त्यामुळे प्रवाशांचा आत्मविश्वास दुपटीने वाढणार आहे.
असा असणार मेट्रो रूट
हिंजवडी ते शिवाजीनगर असा हा मेट्रो रूट असणार आहे. या मेट्रो रूटवर एकूण 23 स्थानके आहेत. मेगापोलीसी सर्कल, बिझनेस पार्क, इन्फोसिस फेज 1, विप्रो फेज 2, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, बाणेर, सकाळ नगर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, आरबीआय, ॲग्रीकल्चर कॉलेज, शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय.
महिलांना तांत्रिक क्षेत्रात संधी मिळेल
शंभर महिलांद्वारे मेट्रो चालवण्याचा पुणे मेट्रोचा हा निर्णय फक्त वाहतूक समस्येवर पर्याय नसून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. महिलांना तांत्रिक क्षेत्रात मोठ्या संधी यामुळे उपलब्ध होणार आहेत.