Pune-Nashik Railway : पुणे-नाशिकरांसाठी दिलासा! रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट आली समोर; जाणून घ्या सविस्तर
Last Updated:
Pune-Nashik Railway Project : पुणे-नाशिककरांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला पुणे-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प पुन्हा चर्चेत आला असून त्याबाबत महत्त्वाची अपडेट मिळाली आहे.
पुणे : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प गेल्या अनेक दशकांपासून चर्चेचा विषय ठरत आलेला आहे. या मार्गावरून प्रत्यक्षात रेल्वे धावेल का असा प्रश्न अद्यापही प्रत्येकासाठी अनुत्तरित आहे. नागरिकांच्या दृष्टीने हा प्रकल्प आजही स्वप्नच आहे. सरकारने वेळोवेळी या प्रकल्पाबाबत आश्वासने दिली असली तरी ठोस कामाचा वेग फारसा दिसून येत नाही. त्यामुळेच हा विषय अधूनमधून चर्चेत येतो आणि पुन्हा एकदा लोकांच्या अपेक्षांचा विषय बनतो.
रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या एका कंटेनरवर रेल्वेची बोगी दिसली. हे दृश्य एका नागरिकाने य मोबाईल कॅमेऱ्यात टिपले आणि सोशल मीडियावर शेअर केले. काही मिनिटांतच हे छायाचित्र व्हायरल झाले. लोकांमध्ये लगेचच चर्चा सुरू झाली की अखेर पुणे-नाशिक रेल्वे लवकरच धावणार का? हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होण्याच्या उंबरठ्यावर आहे का?
advertisement
अनेकांना या छायाचित्रामुळे पुन्हा एकदा आशा वाटू लागली. मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प अजूनही गूढच असल्याचे नागरिक मानत आहेत.
खरं तर पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला सुरुवातीपासूनच आर्थिक, प्रशासकीय आणि तांत्रिक अडथळे येत राहिले आहेत. त्यामुळे अनेक वेळा प्रकल्प पुढे ढकलला गेला. पायाभूत सुविधा, खर्चाचा अंदाज आणि मार्गातील अडचणी यामुळे कामाला योग्य वेग मिळू शकला नाही. तरीही जेव्हा अशा बोगी वाहतुकीची छायाचित्रे किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर येतात. तेव्हा लोकांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण होते.
advertisement
याआधीही अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील एकलहरे परिसरात रेल्वेची बोगी कंटेनरवरून जाताना दिसली होती. आजही लोकांच्या मनात तोच प्रश्न आहे पुणे-नाशिक रेल्वे खरोखर सुरू होणार का? की ही फक्त घोषणांपुरतीच राहणार आहे. सरकारने यावर अंतिम निर्णय घेऊन ठोस कृती आराखडा जाहीर केल्याशिवाय या प्रकल्पाबद्दलची संभ्रमावस्था कायम राहणार आहे.
जोपर्यंत रेल्वेचा प्रत्यक्ष धावता रुळांवर दिसत नाही, तोपर्यंत पुणे-नाशिक रेल्वे लोकांसाठी केवळ एक अपूर्ण स्वप्नच ठरणार आहे. मात्र सोशल मीडियावरील प्रत्येक नव्या चर्चेमुळे या प्रकल्पाबद्दलची आशा पुन्हा पेट घेत राहते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 7:54 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune-Nashik Railway : पुणे-नाशिकरांसाठी दिलासा! रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट आली समोर; जाणून घ्या सविस्तर