TRENDING:

Pune Navale Bridge Accident: नवले पुलावर कंटेनर आणि ट्रकमध्ये अडकलेल्या कारमधील मृतांची नाव समोर, 3 वर्षांचा मुलाचा समावेश

Last Updated:

कंटेनर शेवटी एका कारला धडक दिली आणि पुढे एका ट्रकला जाऊन आदळला. या दोन्ही गाड्यांच्या धडकेमध्ये कारमध्येच सापडली होती

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरचं ब्रेक फेल झालं आणि त्यानंतर २२ गाड्यांना चिरडलं. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० जण जखमी झाले आहे. या अपघातात कंटेनर आणि ट्रकमध्ये एक कार अडकली होती. या कारमधील सगळ्या प्रवाशांचा जळून कोळसा झाला. या प्रवाशांची नाव समोर आली आहे.

advertisement

पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. संध्याकाळी ५.३६ च्या सुमारास साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या राजस्थान पासिंग कंटेनरचं ब्रेक फेल झालं. त्यानंतर हा कंटेनरवरून चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर समोर येईल त्या वाहनांना कंटेनरने धडक दिली.  जांभूळवाडी ते नवले ब्रिजदरम्यान हा सगळा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे, कंटेनर शेवटी एका कारला धडक दिली आणि पुढे एका ट्रकला जाऊन आदळला. या दोन्ही गाड्यांच्या धडकेमध्ये कारमध्येच सापडली होती. सीएनजी कार असल्यामुळे कारला आग लागली.

advertisement

कंटेनर कार आणि समोर असलेला ट्रक ही तिन्ही वाहनं काही अंतर फरफरटत गेली. या भयानक अपघातात कारमध्ये असलेल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.  कारमध्ये मृतांमध्ये एका ३ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.  मृतांची नावं खालील प्रमाणे...

⁠१. स्वाती नवलकर

2)  शांता दत्तात्रय दाभाडे (वय 54 वर्ष)

3) दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे (वय 58 वर्षे राहणार सत्यसाई अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 10, धायरी फाटा पुणे)

advertisement

4) मोक्षिता हेमकुमार रेड्डी (वय 03 वर्ष, B 301, पॅराडाईज वन, स्वराज कॅपिटल जवळ, लक्ष्मी चौक, चिखली पुणे)

5)  कारचालक  धनंजय कुमार कोळी ( वय 30 वर्ष, राहणार सोनवणे वस्ती चिखली पुणे मुळगाव जयसिंगपूर)

तर कंटेनर चालकाचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कंटेनर चालकाची ओळख अद्याप पटली नाही. या कंटेनरने नियंत्रण सुटल्याने १५ ते २० वाहनांना धडक दिली. घटनास्थळी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

advertisement

अपघात नेमका झाला कसा? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

राजस्थान पासिंगचा जो भरलेला ट्रक होता. तो साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईकडे जात होता. परंतु, या ठिकाणी येत असताना नवले ब्रिजवर सेल्फी पॉईंट आहे, त्या ठिकाणी ब्रेक फेल झालं. त्यानंतर समोर येईल, ज्या गाड्यांना धडक देत होता. यामध्ये जवळपास २० ते २२ गाड्यांना धडक देत तो पुढे आला. त्यानंतर एका मोठ्या ट्रकला मागून धडकला. यावेळी दोन्ही गाड्यांमध्ये कार सापडली. त्या कारचा सँडविच झाला. ही कार CNG कार होती, कारमध्ये जे लोक अडकले त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Navale Bridge Accident: नवले पुलावर कंटेनर आणि ट्रकमध्ये अडकलेल्या कारमधील मृतांची नाव समोर, 3 वर्षांचा मुलाचा समावेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल