अपघातांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय
गेल्या काही महिन्यांपासून नवले पुल परिसरात अपघाताच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या अपघातांच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने कारवाई करत मानाजीनगरकडे जाणारा मार्ग कायमस्वरूपी बंद केला.
Pune News: नवले पुलानंतर आता हिंजवडीतही वाहतुकीचे नवे नियम; मोडल्यास कडक कारवाई
advertisement
दरम्यान, हा तातडीचा बदल झाला असला, तरी पुढील काळात दीर्घकालीन उपाययोजनांवर लक्ष देण्याची गरज आहे. स्वामिनारायण मंदिर ते वारजे पूल या दरम्यानच्या संपूर्ण रस्त्याचे नवीन नियोजन करून, दर्जेदार आणि सुरक्षित असा एलिव्हेटेड पूल उभारण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सर्व्हिस रस्त्यावर वाढणार ताण
नवले पुलाच्या मार्गात झालेल्या बदलामुळे स्वामिनारायण मंदिराजवळील सर्व्हिस रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. रस्ता बंद झाल्यानंतर सर्व वाहने याच मार्गावरून वळवली जात असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
पूर्वी बंद केलेल्या रस्त्यावरून अनेक वाहनचालक धोकादायक पद्धतीने वळण घेत असल्याने अपघातांची भीती होती. आता हा मार्ग कायम बंद झाल्यामुळे गंभीर अपघातांचा धोका कमी होईल आणि सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक सुरळीत राहील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.






