वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक योजना
पर्वती विधानसभा मतदारसंघात महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मोहोळ यांनी शुक्रवारी पदयात्रा केली आणि फेरीद्वारे मतदारांशी संपर्क साधला. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळही त्यात सहभागी होत्या. यावेळी त्यांनीही पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सक्षम बनवणे हा मुख्य उद्देश आहे. मेट्रो आणि पीएमपी सेवा कार्यक्षम चालवण्याचे नियोजन आहे, तसेच ताफ्यात एक हजार ई-बस आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरातील बस मार्ग आणि फेरींचा फेरआढावा देखील घेतला जाणार आहे.
advertisement
सरकारच्या मंजुरीनंतर पीएमपीच्या सेवा विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या 394 मार्गांवर बस सेवा चालत असून, यामध्ये आणखी किमान 100 नवीन मार्ग जोडले जातील. यामुळे उपनगरातील दुर्लक्षित भाग, झपाट्याने विकसित होत असलेले शहराबाहेरील परिसर, तसेच औद्योगिक आणि आयटी हबपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचेल.
पीएमपीकडून 25 इलेक्ट्रिक डबल डेकर बस सेवा भाडेतत्त्वावर सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, येत्या वर्षात पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा डबल डेकर बस धावतील, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.






