TRENDING:

Pune News: रेल्वे विभागाच्या "खान- पान" सेवेला करोडोंचा महसूल, केटरिंगच्या उत्पन्नात विक्रमी वाढ

Last Updated:

Pune Railway News: खान- पानाचा दर्जा सुधारण्यासाठी मध्ये रेल्वेने मागील काही महिन्यात अनेक प्रयोग केले आहेत. त्यामुळे केटरिंगच्या उत्पन्नात यंदा मोठी वाढ झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
खान- पानाचा दर्जा सुधारण्यासाठी मध्ये रेल्वेने मागील काही महिन्यात अनेक प्रयोग केले आहेत. त्यामुळे केटरिंगच्या उत्पन्नात यंदा मोठी वाढ झाली आहे. केटरिंगमधून पुणे रेल्वे विभागाला मागच्या 6 महिन्यात तब्बल 1 कोटी 71 लाखांचा महसूल मिळाला आहे. रेल्वे स्थानक आणि रेल्वेत मिळणारे अन्न हे चांगले नसल्याच्या तक्रारी मागच्या वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. ह्याच गोष्टीची काळजी घेऊन पुणे विभागातील वाणिज्य विभागाकडून नियोजन करून मोठे प्रयत्न करण्यात आले.
कॅटरिंगमधून पुणे रेल्वे विभागाला मोठा महसूल..
कॅटरिंगमधून पुणे रेल्वे विभागाला मोठा महसूल..
advertisement

दर्जाहीन अन्न विकणाऱ्या वेंडर्सकडून रेल्वे विभागाकडून वारंवार कारवाई करण्यात आली. तसेच अवैध वेंडर्सला रेल्वे स्थानक आणि रेल्वेत खाद्यपदार्थ आणि पेय विकण्यास मनाई देखील करण्यात आली. रेल्वेतील किचनचा दर्जा दर्जा तपासण्यासाठी त्याठिकाणी साफसफाई पाहण्यासाठी,सोबतच खाद्यपदर्श चांगले आहेत की नाही हे तपासण्यासाठी पथक नेमून,वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमधून नमुने घेण्यात आले. रेल्वेतील अस्वच्छ किचन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई देखील करण्यात आली.

advertisement

अचानक तपासणी आणि कारवाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात आज वाढ की घट? कोणत्या मार्केटमध्ये किती मिळाला भाव? Video
सर्व पहा

कोणतीही परवानगी असताना रेल्वे प्रवाशांना खाद्यपदार्थ तसेच विविध पेय देणाऱ्या जवळपास 200 वेंडर्स विरोधात धडक कारवाई करण्यात आली.एक महिन्यात त्यांच्याकडून 56 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.खाद्यपदार्थांचा स्टॉल वर अचानक भेटून देऊन,किचन मध्ये देखील अचानक भेटी देऊन तपासणी केली. एप्रिल ते सप्टेंबर ह्या 6 महिन्यांचा कालावधीत मध्य रेल्वेचा कॅटरिंग मधून 1 कोटी,70 लाख 98 हजारांचा महसूल मिळाला आहे. एकच महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात 48 लाख 73 हजारांचे उत्पन्न मिळाले.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: रेल्वे विभागाच्या "खान- पान" सेवेला करोडोंचा महसूल, केटरिंगच्या उत्पन्नात विक्रमी वाढ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल