निगडीतील दुर्गा टेकडी हा परिसर निसर्गसंपन्न असून याठिकाणी दररोज अनेक नागरिक फेरफटका व व्यायामासाठी येत असतात. टेकडीच्या आसपास जलशुद्धीकरण केंद्र तसेच अॅम्युनिशन फॅक्टरीचा संरक्षित भाग आहे. हा संपूर्ण परिसर घनदाट झाडे-झुडपे आणि जंगलाने वेढलेला आहे.
Pune News: त्या दुचाकीस्वाराकडे पाहून आला संशय; अडवून पोलिसांनी तपासली बॅग, उघडताच बसला धक्का
advertisement
अनेक प्रकारचे प्राणी याठिकाणी आढळतात आणि महत्त्वाचं म्हणजे या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अन्नाच्या शोधात बिबट्या येथे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून दुर्गा टेकडी तात्पुरती बंद करण्यात आली असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.
महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी सांगितले की, आम्ही वनविभागाच्या सतत संपर्कात आहोत. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सूचना व आदेशांचे पालन करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.






