मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित अखाड आणि गणेश राऊत असं अटक केलेल्या चार आरोपींची नावं आहेत. या चारजणांसोबत आणखी एका अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हे पाचही आरोपी घायवळ टोळीचे सदस्य आहेत. या पाचही जणांनी बुधवारी मध्यरात्री पुण्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही इथले भाई आहोत, असं म्हणत त्यांनी हे गुन्हेगारी कृत्य केल्याची माहिती पुण्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. यावेळी त्यांनी सगळा घटनाक्रम देखील सांगितला.
advertisement
पुण्यात घायवळ टोळीचा गोळीबार, संपूर्ण घटनाक्रम काय?
या घटनेची अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलं, "पुण्यातील कोथरुड परिसरात मुठेश्वर परिसर आहे. या परिसरात बुधवारी रात्री साडेअकरा वाजता प्रकाश धुमाळ आले होते. ते आपल्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी खेड शिवापूरला गेले होते. पार्टीनंतर धुमाळ त्यांचा एक साथीदार मुठेश्वर भागात राहत होता. त्यामुळे त्याला ड्रॉप करायला गेले होते. ते ड्रॉप करत असताना तिथे पाचही संशयित आरोपी आले."
आम्ही इथले भाई म्हणत माजवली दहशत
"आरोपींनी आम्हीच याठिकाणचे भाई आहोत. तुम्ही इथं का थांबलात, असं म्हणत दहशत माजवली आणि प्रकाशच्या मांडीवर गोळी झाडली. यात ते जखमी झाले. जखमीला तत्काळ पोलिसांनी सह्याद्री रुग्णालयात दाखल केलं. त्याची प्रकृती आता आऊट ऑफ डेंजर आहे. यात पाच ते सहा आरोपी आहेत. सर्वजण निलेश घायवळ टोळीतील असल्याचं समोर आलं आहे. या गोळीबारानंतर याच आरोपीनीं घटनास्थळावरून काही अंतरावर असणाऱ्या एका कॉलनीजवळ सागर साठे नावाच्या व्यक्तीवर कोयत्याने वार केले. दोन्ही घटनांमध्ये ३०७ आणि इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत," असंही पोलीस उपायुक्त कदम यांनी सांगितलं.