रोहित ठोक रे यांना, मयऱ्या खाली उतरून....
धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये आरोपींनी 'तुला लय माज आला आहे का? इथे कशाला थांबला आहे. हा आमचा एरिया आहे, असे म्हणत रोहित ठोक रे यांना, मयऱ्या खाली उतरून बघरे, यांना यांची आज विकेटच टाकू' असे म्हणत गोळीबार केला. तेथून पुढे 10 मिनिटांनी आरोपींना वैभव साठे हा त्याचे मित्र सुनील हरळय्या आणि यश गोडावत यांच्यासोबत सागर कॉलनी येथील एका घरासमोर बसलेला दिसला.
advertisement
कपाळाला पिस्टल लावलं अन्...
मयूर कुंबरे आणि सुनील हरळय्या यांच्यातील जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी सुनील याला शिवीगाळ करीत 'याला मारून टाका, सोडू नका' असे म्हटल्याने हरळय्या तेथून पळून गेला. यामुळे चिडलेल्या आरोपींनी आपला मोर्चा वैभव साठे याच्याकडे वळवत 'त्याच्या कपाळाला पिस्टल लावत, तू सुनील सोबत फिरतो का... तुला पण जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गणेश राऊत याने त्याच्याकडील कोयत्याने वैभव साठेवर हल्ला केला', असे म्हटले आहे.
आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
दरम्यान, गोळीबारामध्ये प्रकाश मधुकर धुमाळ असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे, तर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात वैभव तुकाराम साठे हा गंभीर जखमी झाला आहे. दोघांच्या फिर्यादीवरून मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक ऊर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर ऊर्फ अंड्या, दिनेश फाटक व अन्य सहकारी यांच्या विरोधात विविध कलमांसह आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
