खंडणी प्रकरणात चौघांना अटक
खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांनी शेखर दत्तात्रय अंकुश, मनीष वर्धेकर, सागर बाळकृष्ण थोपटे आणि रोहित सुधाकर बहादूरकर यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. आंदेकर टोळीतील वनराज आंदेकरची पत्नी सोनालीलाही आरोपी करण्यात आले आहे. आंदेकर टोळी मासळी बाजारातील प्रत्येक विक्रेत्याकडून दरमहा 15 ते 20 हजार रुपये हप्ता वसूल करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खंडणीच्या पैशावर आंदेकर टोळीने घर आणि संपत्ती जमवल्याचा आरोप आहे.
advertisement
कोणत्या मार्गाने 'माया' जमवली?
कुख्यात आंदेकर टोळीच्या आर्थिक स्रोतांची शहानिशा करण्यासाठी पुणे पोलिस आता थेट प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधणार आहेत. या टोळीने नेमक्या कोणत्या मार्गाने 'माया' जमवली, त्यांचे मालमत्तेशी संबंधित किती व्यवहार वैध आहेत आणि किती 'काळ्या पैशांतून उभे राहिले, याचा मागोवा घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाला पत्र पाठविले जाणार आहे.
आर्थिक मुळावर घाव
दरम्यान, आता पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. आंदेकर टोळीवर अनेक गुन्हे दाखल झाले; पण त्यांच्या आर्थिक स्रोतांवर कधीच तपास झाला नव्हता. त्यामुळे टोळीला अधिक बळकटी मिळाली होती. पोलिसांनी आता त्यांच्या आर्थिक मुळावर घाव घालण्याचे धोरण आखले आहे.