निलेश घायवळ समीर पाटीलच्या संपर्कात
चंद्रकांत पाटील सध्या आत्मचिंतन करत असतील. आत्मचिंतन केल्यानंतर ते घायवळबाबत बोलतील. निलेश घायवळ हा समीर पाटील याच्या संपर्कात होता. समीर पाटील मोक्यातला गुन्ह्याचा आरोपी आहे, असं म्हणत शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी चंद्रकात पाटील यांच्यावर थेट टीका केली आहे. समीर पाटील यांचा निलेश घायवळ यांच्यासोबतचा फोटो धंगेकरांनी दाखवला. त्यानंतर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. निलेश घायवळ संदर्भात पोलीस महासंचालक यांना या संदर्भात देखील पत्र लिहिलं आहे, असंही धंगेकर म्हणाले.
advertisement
पुण्यावरचा गुन्हेगारीचा डाग पुसा
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना चांगला धडा शिकवावा. पुण्याला गुन्हेगारीचा डाग लागणार असले तर हा डाग पुसून काढला पाहिजे. जर ग्रह खात्याने ठरवलं तर आजपासून 15 दिवसात निलेश घायवळ टोळी महाराष्ट्रात दिसणार नाही. पुणे पोलिसांनी जसा आंदेकर टोळीवर बुलडोझर चालवला अन् तपास शेवटच्या टोकापर्यंत केला, त्याचप्रमाणे देखील याचा तपास झाला पाहिजे. पोलीस खात्यातून दबका आवाज आहे हा माणूस आम्हाला त्रास देतोय, असं म्हणत धंगेकरांनी मोठा मुद्दा उपस्थित केलाय.
समीर पाटील कोण?
दरम्यान, समीर पाटील कोण तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे लुडबुड करणारा आहे. दादाकडून गुन्हेगारी क्षेत्रात काही लोकांना मदत करणारा, पोलिसांना त्रास देणारा आहे, असा आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे. कोथरूडमधील गुन्हेगारी, निलेश घायवळ प्रकरणी, पासपोर्टची छेडछाड, सरकारी कागदांमध्ये छेडछाड करण्याचं काम समीर पाटील करतो, असं रविंद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.