अजिंक्य रायसिंग जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या ३२ वर्षीय पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. ते पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवासी असून पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत.पीएसआय जाधव यांच्यावर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि तक्रारदार तरुणी यांची २०२३ मध्ये समाज माध्यमांवर ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. उपनिरीक्षक जाधव याने तरुणीला लग्न करण्याचे खोटं आमिष दाखवलं. या आमिषाचा फायदा घेऊन त्याने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेनं केला आहे.
advertisement
कालांतराने, तरुणीने उपनिरीक्षक जाधवकडे विवाहाबाबत विचारणा केली. मात्र, लग्नाच्या मागणीनंतर जाधवने तरुणीसोबत विवाह करण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही, तर लग्नाची मागणी करणाऱ्या तरुणीला त्याने शिवीगाळ केली, मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर प्रकारानंतर तरुणीने धीर करून फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि उपनिरीक्षक जाधवविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य जाधव याच्याविरुद्ध फसवणूक, बलात्कार, मारहाण आणि धमकी अशा विविध कलमांखाली गुन्हा (FIR) दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.