संशयामुळे तक्रारीला उशीर : अहिरेगाव येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे व्यवसायाने देवऋषी आहेत. त्यांनी आपल्या घरातील एका खोलीत स्टीलच्या टाकीमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित ठेवली होती. २ ऑक्टोबर रोजी ही चोरी उघडकीस आली होती.
मात्र, सुरुवातीला आपल्याच कुटुंबातील सदस्यांनी हे दागिने घेतले असावेत, असा संशय फिर्यादींना होता. घरातील अंतर्गत वादातून हे घडले असावे या शक्यतेने त्यांनी पोलिसांत जाणे टाळले. परंतु, सर्व बाजूंनी खात्री पटल्यानंतर आणि चोरी बाहेरील व्यक्तीनेच केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी आता पोलिसांत धाव घेतली आहे. चोरट्याने घराच्या खिडकीतून आत प्रवेश करून हातसफाई केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
advertisement
दागिने घडवण्यासाठी विश्वासू कारागिराकडे दिले; पण..., पुण्यात 21 लाखांचं सोनं लंपास
हडपसरमध्ये शेळ्या-बोकडांची चोरी:
दुसरीकडे हडपसरमधील गोंधळेनगर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी शेळ्या आणि बोकडांची चोरी केली आहे. सुनीता रनवरे (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १७ डिसेंबरच्या रात्री कॅनॉललगतच्या कंपाउंडमध्ये शिरून चोरट्यांनी सुमारे १ लाख ९६ हजार रुपये किमतीची जनावरे चोरून नेली.
कल्याणीनगरमधील पीजीमध्ये चोरी: येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित 'पेईंग गेस्ट' (PG) हॉस्टेलमध्येही चोरीची घटना घडली. कल्याणीनगर येथील स्मार्ट लिव्हिंग गर्ल्स अँड बॉइज पीजीमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याची ३५ हजार रुपयांची सोनसाखळी खोलीतून चोरीला गेली आहे.
