बनावट पासपोर्ट वापरून दुबईला पळाला
2019 मध्ये गुन्हे शाखेने त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (MCOCA) आरोप लावला होता. परंतु 2022 मध्ये निलेश घायवळप्रमाणे तो बनावट पासपोर्ट वापरून दुबईला पळून गेला. लॉरेन्स बिश्नोईने साबरमती तुरुंगातून व्हिडिओ कॉलद्वारे हाशिम बाबाला सूचना दिल्या आणि रशीदने कट रचला, असं तपासातून समोर आलं आहे.
advertisement
भारतीय गुप्तचर संस्था सक्रिय
एका नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार, जामीन मिळाल्यानंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आलं आहे की, पाळत ठेवण्यात आली आहे हे स्पष्ट नाही. त्याच्या प्रत्यार्पणासाठी आता भारतीय गुप्तचर संस्था सक्रिय झाल्या आहेत. निलेश घायवळप्रमाणे रशीद केबलवाला याने फेर पासपोर्ट तयार केला होता.
पोलिसांच्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की , आम्ही त्याचा गुन्हेगारी इतिहास आणि कागदपत्रे योग्य माध्यमांद्वारे शेअर करू. रशीद केबलवाला दिल्ली पोलिसांच्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत आहे. तो तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर हाशिम बाबाचा जवळचा सहकारी आहे आणि त्याच्या टोळीच्या कारवाया हाताळत होता. तो कुख्यात लॉरेन्स बिश्नोई सिंडिकेटशी देखील संबंधित आहे . गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ग्रेटर कैलास-1 मध्ये व्यापारी नादिर शाह यांच्या हत्येप्रकरणी त्याचं नाव समोर आलं.