30 वर्षांच्या पीडित महिलेचं मागच्याच महिन्यात 35 वर्षांच्या मुलासोबत लग्न झालं होतं. मुलगा शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम नसल्याचं माहिती असूनही त्याचं लग्न पीडित महिलेसोबत लावलं गेलं, तसंच या सगळ्या गोष्टी सासरे, सून आणि स्वत: नवऱ्याने पीडितेपासून लपवल्या गेल्या, असंही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पुण्याच्या सहकार नगर भागात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
advertisement
लग्नाच्या महिनाभरानंतर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सूनेच्या बेडरूममध्ये गेला आणि त्याने सुनेकडे शरीर सुखाची मागणी केली. नकार दिला तर परिणाम भोगायला तयार राहा, अशी धमकीही सासऱ्याने दिल्याचा आरोप सुनेने केला आहे. 5 जून ते 23 जून 2025 च्या दरम्यान वारंवार हे प्रकार घडल्याचंही पीडित महिलेने सांगितलं आहे. याप्रकरणी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, त्यांची पत्नी आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.