TRENDING:

विसर्जनानंतर माती द्या आणि पुढच्या वर्षी बाप्पा घ्या! पुणेकरांची भन्नाट संकल्पना

Last Updated:

तुमच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर त्याचं माती पासून तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी बाप्पा बनवून देण्यात येणार आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 25 सप्टेंबर : 19 सप्टेंबरला लाडक्या बाप्पाचं थाटा माटात आगमन झालं आणि आता विसर्जनाची तयारी सगळीकडे पाहिला मिळतीय. दीड दिवसाच्या गणपतीचे आता विसर्जन झालं आहे. आणि अशातच अनंत चतुर्दशी जवळ आली आहे. त्यामुळे पुण्यातील एका मूर्तीकाराने एक अनोखी संकल्पना राबवलीय. तुमच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर त्याचं माती पासून तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी बाप्पा बनवून देण्यात येणार आहे.
advertisement

कोणी राबवलीय संकल्पना?

पुण्यातील धायरी परिसरात राहणारे संदीप वाघमारे हे व्यवसायाने मूर्तीकार आहेत. त्यांनी ही अनोखी संकल्पना राबवली आहे. तुमच्या गणपती बाप्पाच्या शाडूच्या मातीच्या मूर्ती असतील त्या मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्याची माती तुम्ही संदीप वाघमारे यांना देऊ शकता. या मातीपासून तुम्हाला पुढच्या वर्षी बाप्पाचे एक वेगळे रूप पाहिला मिळेल.

ससून हॉस्पिटलच्या रुग्णांनी बेडवरुनच घेतलं दगडूशेठ बाप्पाचं दर्शन, Video

advertisement

पूर्वी कणकचेसुद्धा गणपती बनवले जायचे आता पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस ) चा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आणि त्याच्यावर वापरणाऱ्या केमिकल रंग हे नष्ट होत नाहीत. ते रंग पाण्यात सहा ते सात महिने जात नाही. यामधून पाण्याचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतंय. मी गेल्या वर्षी पासून शाडू मातीचे गणपती बनवतो आहे. शाडू मातीचे गणपती बनवण्याचा उद्देश असा आहे की ही माती पाण्यात विरघळते. याच्यापासून कुठलेही प्रदूषण होत नाही. त्यामुळे मी भाविकांना सांगू इच्छितो की मूर्ती विसर्जित केल्यानंतर ती माती मला परत द्या त्याच मातीतून तुम्हाला पुढच्या वर्षी नवीन गणपती बनवून देईल, असं मूर्तिकार संदीप वाघमारे यांनी सांगितले.

advertisement

नितीन चंद्रकांत देसाईंची अनोखी संकल्पना, आता पुण्यातच होणार चारधाम यात्रा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

ही माती कोकण आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. आता मात्र तिचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे आणि याचे कारण म्हणजे नष्ट झालेले नदीकाठचे गवत, मुसळधार पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या नद्या. ही माती तयार होण्यास बऱ्याच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळेच याचे जतन करण्यासाठी योग्य पद्धतीने यांचा वापर केला गेला पाहिजे. यामुळे भविष्य काळात यांचा वापर पुढच्या पिढीला देखील करता येईल, असंही मूर्तिकार संदीप वाघमारे यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
विसर्जनानंतर माती द्या आणि पुढच्या वर्षी बाप्पा घ्या! पुणेकरांची भन्नाट संकल्पना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल