पुणे : मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा समाधी महोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. मलेशियात राहणाऱ्या भारतीय नागरीकांच्या वतीने भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. साधु, संत, वारकरी मंडळी आणि भारतातून आलेल्या भक्तपथ फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांचे मराठी मंडळ मलेशिया यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यात मलेशियामधील भाविकांनीही सहभाग घेतला होता.
advertisement
श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांनी महाराष्टातून पंजाबपर्यंत भागवत धर्माची पताका फडकावत शांतीचा संदेश दिला. आजही त्यांच्या विचाराने भागवत धर्माचे अनुयायी देशभर कार्यरत असून ते देशभरात संतांचे विचार पोहचवण्याचं कार्य करत आहेत. यातच संत नामदेव महाराजांच्या विश्वभ्रमण दिंडी सोहळ्याचा सांगता समारंभ मलेशियात पार पडला. यावेळी विठ्ठल भक्तीच्या भजनांनी सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
200 कारागीर, 111 फूट उंच गाभारा, यंदाचा दगडूशेठ हलवाई गणपतीचा देखावा असणार खास, VIDEO
251 ज्ञानेश्वरी ग्रंथांचं वाटप -
श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा साजरा करून भागवत धर्माचा झेंडा संपूर्ण विश्वात पोहचवण्याचे कार्य विश्व भ्रमण दिंडीमार्फत होत आहे. तब्बल 51 देशामध्ये आपल्या सर्व संतांचे विचार घेऊन जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या निमित्ताने मलेशियामध्ये 251 ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटपदेखील करण्यात आले. यावेळी परदेशी नागरिकांनी या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला होता.
याठिकाणी आहे भीमा-सीना नदीचा संगम, राज्याबाहेरुनही येतात लोकं, जागेला विशेष धार्मिक महत्त्व, VIDEO
संतांचे विचार देशभरात पोहचवण्याचे काम करणार -
या समाधी सोहळ्यात मराठी मंडळ मलेशियाचे सर्व सदस्य आणि शेकडो भारतीय नागरिक आणि मलेशियातील नागरिक सहभागी झाले होते. सगळ्यांनी भजन कीर्तन आणि सत्संगाचा आनंद लुटला. सर्वांना स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांनी संबोधित केले. आणखी इतर देशात जाऊन भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करणार तसेच संतांचे विचार देशभरात पोहचवण्याचे काम करणार असल्याचे यावेळी विश्व भ्रमण दिंडीच्या वतीने सांगण्यात आले.