याप्रकरणी आंबेगाव येथील 31 वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 5 नोव्हेंबर 2023 ते 7 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडली. फिर्यादी तरुण विवाहित असून तो एसआरपीएफमध्ये जवान आहे.
नेमके घडले तरी काय?
माहितीनुसार आरोपी तरुणी पीएमपीएलमध्ये कंडक्टर आहे. तिने फिर्यादीशी गोड बोलून मैत्री प्रस्थापित केली आणि त्याला घरी बोलावून शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले. परंतु संबंध ठेवल्यानंतर तिने बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. या धमकीच्या जोरावर तरुणीने फिर्यादीकडून 1,72,664 रुपयांची खंडणी उकळली, ज्यात रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. त्यानंतर तिने आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली होती.
advertisement
फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता त्याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात 8 फेब्रुवारी 2025 रोजी बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चौकशी केली असता या तरुणीची खरी हकीकत समोर आली.
प्रेमाच्या जाळ्यातून युवकांची फसवणूक
माहिती अशी आहे की, या तरुणीने एसआरपीएफ जवानासह आणखी दोन तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले. 2017 मध्ये नांदेडमधील एका तरुणाशी आणि 2022 मध्ये कंधारमधील एका तरुणाशी तिने अशीच पद्धत वापरली. प्रत्येक प्रकरणात तिने शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले आणि नंतर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करून खंडणी उकळली. या सर्व घटनांमुळे स्पष्ट होते की ही तरुणी प्रेमजाळ्याच्या नावाखाली तरुणांना फसवत होती.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड करीत आहेत. या प्रकरणातून स्पष्ट होते की सोशल मीडियावर ओळख करून तरुणांशी संपर्क साधताना सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण अशा प्रकारच्या फसवणुकीचा धोका सर्वांवर असतो.