TRENDING:

भारतात जर 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली पाहिजे का? पोरं थेट बोलली...

Last Updated:

ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही सोशल मीडिया बंदी असायला हवी का? याबाबत 16 वर्षांखालील मुलांची मते काय आहेत? ते लोकल 18 ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: ऑस्ट्रेलियन सरकारने अलीकडेच एक महत्त्वाचा निर्णय अंमलात आणला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशी बंदी लागू करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. या निर्णयानंतर इतर देशांमध्येही अशा प्रकारची बंदी घालावी का, यावर चर्चा सुरू झाली आहे. भारतातही 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी असावी, असे मत मद्रास कोर्टाने व्यक्त केले आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतात अशी बंदी असायला हवी का? याबाबत 16 वर्षांखालील मुलांचे मत लोकल 18 ने जाणून घेतले आहे.
advertisement

ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. अल्पवयीन मुलांना ऑनलाइन आक्षेपार्ह कंटेंट सोशल मीडियावर अगदी सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्यांच्यावर योग्य निर्बंध आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. या निर्णयाबाबत मुलांची मते संमिश्र असल्याचे दिसून येत आहे. काही मुलांच्या मते भारतात सोशल मीडियावर बंदी असावी, तर काहींना अशी बंदी नको आहे. 16 वर्षांखाली मुलांनी मांडलेल्या वक्तव्याची सर्वत्र चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

advertisement

बंदीला पाठिंबा देणाऱ्या मुलांची मतं...

बंदीला पाठिंबा देणाऱ्या मुलांची मते अशी आहेत की, आजकाल फार लहान वयातच मुले मोबाईलच्या अधिन जाताना दिसत आहेत. मोबाईल दिला नाही तर अनेक मुलं जेवणही करत नाहीत. सतत मोबाईलच्या वापरामुळे मुलं चुकीचा कंटेंट सहज उपलब्ध असल्यामुळे चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता असते. अशा घटना सातत्याने वेगवेगळ्या शहरांतून समोर येताना दिसत आहेत. मोबाईलच्या अतिवापराचा अभ्यासावरही परिणाम होत आहे. या सर्व कारणांमुळे ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही सोशल मीडियावर बंदी असावी, अशी मते काही मुलांनी व्यक्त केली आहेत.

advertisement

भारतात बंदी घातली तर आम्ही आंदोलन करू..

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आदितीची कमाल, गॅस सिलेंडरच्या मदतीने बनवला हिटर, शुन्य येतंय वीजबिल
सर्व पहा

काही मुलांच्या मतानुसार भारतात सोशल मीडियावर बंदी नसावी. त्यांच्या मते... सोशल मीडियामुळे आपल्याला घबसल्या जगभरातील माहिती सहज मिळते आणि त्याचा उपयोग अभ्यासासाठीही होतो. एखादी गोष्ट समजली नाही तर युट्युबवर पाहता येते, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसेही कमावता येतात. पुढे ॲक्टर व्हायचं असल्यास सोशल मीडियाचा उपयोग करून संधी मिळू शकते. त्यामुळे भारतात सोशल मीडियावर बंदी नसायला हवी , काही मुलांनी बंदी घातली तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. एकूण पाहता, 100 पैकी सुमारे 70 टक्के मुलांना भारतात सोशल मीडियावर बंदी नको आहे, तर 30 टक्के मुले बंदीच्या बाजूने आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
भारतात जर 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली पाहिजे का? पोरं थेट बोलली...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल