पुणे : सध्या सर्वत्र पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये अनेक साथीचे आजार देखील होत असतात. तसेच पावसामध्ये भिजल्यामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार देखील होतात. तर यासाठी आयुर्वेदिक काढ्यामुळे थोडा आरामदेखील मिळतो. मात्र, ते काढे कसे बनवायचे व तुम्ही कोणते काढे घेऊ शकता या विषयी डॉ. सचिन पवार यांनी माहिती दिली.
advertisement
पाऊसाळ्या मध्ये होणाऱ्या सर्दी, खोकला अशा लक्षणांना बरे करण्यासाठी आयुर्वेदिक काढ्यांचा उपयोग होतो. यामध्ये काही घरगुती आयुर्वेदिक काढे कसे तयार करायचे याविषयी माहिती घेऊ.
तुळशी आणि आल्याचा काढा -
तुळशीची 10 ते 15 पाने घेऊन आल्याचा एक चमचा रस घ्यायचा आहे. दोन कप पाणी टाकून त्याला चांगले उकळून घ्या. मग नंतर त्यामध्ये एक चमचा मध टाकून घेऊ शकता.
म्हाडाच्या घरासाठी कोणती कागदपत्रे लागतात, आधीच्या तुलनेत प्रक्रिया झाली सोपी, असा करा कर्ज...
हळद आणि काळी मिरी -
हळद एक चमचा आणि काळीमिरी अर्धा चमचा हे दोन कप पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिट उकळून घ्या. त्यामध्ये एक चमचा मध टाकून घेऊ शकता.
गवती आले चहा -
एक ते दोन पान गवती चहा घेऊन एक चमचा आद्रक टाकून उकळून तसेच मध टाकून घेऊ शकता.
तुळशी आणि लवंग -
तुळशीची 10 ते 15 पाने घेऊन 5 लवंग हे दोन कप पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर मध टाकून घ्या.
हे काढे घेऊन जर बरे नसेल वाटत तर जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तर तुमची प्रतिकारशक्ती कमी झालेली असेल त्यामुळे एक चमचा लिंबू एक चमचा आद्रक आणि मध हे मिश्रण जेवणाच्या आधी चाटून घेतलं तर त्यामुळे आराम मिळू शकतो, अशी माहिती डॉ. सचिन पवार यांनी दिली. तुळशी आणि आल्याचा काढा, हळद आणि काळी मिरी, गवती आले चहा, तुळशी आणि लवंग हे काढे घेऊन होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवू शकता.