पुणे : गणपती उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्यात गणपती उत्सवाला देखाव्याची मोठी परंपरा आहे. यामध्ये मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती आहे. याठिकाणी यावर्षी ओडिसा राज्यातील जगन्नाथ पुरीची प्रतिकृती साकारलेली पाहायला मिळत आहे. हे मंदिर लांब असल्याने प्रत्येकाला जाणे शक्य होत नाही. हीच संकल्पना समोर ठेऊन यंदा तुळशीबाग मंडळाने सेम हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. याचविषयी घेतलेला हा आढावा.
advertisement
पुण्यातील श्री तुळशीबाग गणपती (तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) हा मानाचा चौथा गणपती आहे. या गणपतीची स्थापना 1901 मध्ये करण्यात आली. यंदाच्या वर्षी मंडळाने जगन्नाथ पुरी मंदिराचा हुबेहूब देखावा तयार केला आहे. याठिकाणी सुंदर असे नक्षीकाम, झुंबर लावलेले पाहायला मिळत आहे.
सूरतच्या व्यापाऱ्याला आलं स्वप्न, 600 कोटींच्या हिऱ्यात दिसले गणपती बाप्पा, पाहा, PHOTOS
मागील वर्षी उज्जैन येथील महाकाल मंदिराचा देखावा तयार करण्यात आला होता. तर यंदा जगन्नाथ पुरीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. हा देखावा तयार करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागला आहे. त्याचप्रमाणे पूजेसाठी जगन्नाथ पुरीहुन गुरुजींना बोलवण्यात आले आहे. त्यांच्याकडून सर्व पूजा विधी केल्या जात आहे.
भाविकांसाठी 24 तास हे मंदिर खुले आहे. त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, अशी माहिती उत्सव प्रमुख सागर भावसार यांनी दिली आहे.