Rain in Maharashtra : कोकण, मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा, तर विदर्भातील या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही काही ठिकाणी पाऊस होत आहे. आता पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाची स्थिती कशी राहील, याचबाबतचा हा आढावा.
नारायण काळे, प्रतिनिधी
मुंबई : राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही काही ठिकाणी पाऊस होत आहे. आता पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना रेड तर गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पावसाची स्थिती कशी राहील, याचबाबतचा हा आढावा.
advertisement
राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मागील 24 तासांमध्ये हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. पुढील 24 तासांमध्ये मुंबईमधील आकाशी अंशतः ढगाळ राहून मधून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 32 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असेल. तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सूरतच्या व्यापाऱ्याला आलं स्वप्न, 600 कोटींच्या हिऱ्यात दिसले गणपती बाप्पा, पाहा, PHOTOS
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या तीनही जिल्ह्यांना हवामान विभागाने 10 सप्टेंबरसाठी येलो अलर्ट दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर वगळता सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. एकूणच संपूर्ण विदर्भावर पावसाचा जोर हा कायम असणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2024 7:28 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Rain in Maharashtra : कोकण, मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा, तर विदर्भातील या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट