खराडी भागातील एका पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्या पार्टीत अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. त्या पार्टीत काही महिला देखील होत्या. गंभीर मुद्दा हा अंमली पदार्थांचा होता. अंमली पदार्थाचं सेवन प्रांजल खेवलकर यांनी केलं हा कळीचा मुद्दा होता. दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर पुणे सत्र न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे.
advertisement
अंमली पदार्थाच सेवन केलं नसल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट
या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खेवलकरांना जामीन आहे. फॅारेनसिक रिपोर्टमध्ये घटनास्थळी कोकेन एमडी आणि गांजा हे ड्रग्ज मिळाल्याचा उल्लेख होता. खेवलकर यांनी मात्र अंमली पदार्थाच सेवन केलं नसल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट आहे. सेवन करण्यापूर्वीच पोलिसांनी धाड घातल्याने रिपोर्टमध्ये सेवन केलं नसल्याचं स्पष्ट झाले आहे. इन्स्टाग्रामच्या मेसेज मध्ये मात्र अंमली पदार्थ मागवल्याच्या मेसेजचा पुरावा म्हणून आरोपपत्रात उल्लेख आहे.
पार्टीत काय सापडले?
खराडीतील हॉटेल मधील एका खोलीत २७ जुलै रोजी सुरू असलेल्या अंमली पदार्थ पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला.या वेळी प्रांजल खेवलकर याच्यासह सात आरोपींना अटक केली. आरोपींकडून २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा, हुक्का सेट, दारूच्या बाटल्या, दोन वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती असल्यानं या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली होती. त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात बीडच्या एका स्वयंसेवी संस्थेच्यावतीनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर आरोप केले होते.