TRENDING:

शिक्षणात टॉप, गुन्हेगारीत टॉप, पुण्यातील घायवळ गँगचा म्होरक्या निलेश घायवळ नक्की कोण?

Last Updated:

पुण्यात बुधवारी मध्यरात्री निलेश घायवळ टोळीने दोन कांड केले आहेत. एकावर गोळीबार अन् दुसऱ्यावर कोयत्याने वार केले आहेत. पण घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ नक्की कोण आहे?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुण्यात बुधवारी मध्यरात्री निलेश घायवळ टोळीने दोन कांड केले आहेत. कोथरूड भागात घायवळ टोळीच्या चार ते पाच गुंडांनी दोघांवर जीवघेणा हल्ला केला. मुठेश्वर परिसरात प्रकाश धुमाळ याच्यावर गोळीबार केल्यानंतर याच गुंडांनी काही अंतरावर सागर साठे नावाच्या व्यक्तीवर कोयत्याने वार केले आहेत. एकाच रात्री एकाच टोळीने अशाप्रकारे दोन गंभीर गुन्हे केल्याने पुण्यात पुन्हा एकदा निलेश घायवळ टोळी चर्चेत आली आहे.
News18
News18
advertisement

या प्रकरणी पोलिसांनी घायवळ टोळीच्या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित अखाड, गणेश राऊत यांच्यासह अन्य एक असं गुन्हा दाखल झालेल्या पाच आरोपींची नावं आहेत. पाचही जणांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी आम्हीच इथले भाई म्हणत हे हल्ले केले. केवळ गाडीला साईड न दिल्याच्या कारणातून त्यांनी प्रकाश धुमाळ वर गोळीबार केला. तर सागर साठे यांच्यावर काहीही कारण नसताना केवळ दहशत माजवण्यासाठी कोयत्याने वार केले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शांत असणारी घायवळ टोळी पुन्हा एकदा अॅक्टीव्ह झाल्याचं बोललं जातंय.

advertisement

गुंड निलेश घायवळ कोण आहे?

निलेश घायवळ हा कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. त्याच्यावर पुण्यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं, यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची मोठी दहशत होती. मात्र, गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गँगने घायवळवर दोनदा हल्ले केले. त्याचं प्रत्युत्तर देखील घायवळ टोळीने दिलं. दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली होती. कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. 2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला. बाकी गुन्ह्यातदेखील घायवळला जामीन मिळाला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला.

advertisement

निलेश घायवळवर २४ गुन्हे दाखल

घायवळ हा खंडणी, टोळीयुद्ध आणि इतर हिंसक गुन्ह्यांसह अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील आहे. घायवळचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये समोर आले आहे. तो पुण्यातील टोळीयुद्ध, हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यामध्ये होता. निलेश घायवळ मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा रहिवासी आहे. निलेश घायवळ विरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात 23 ते 24 गुन्हे दाखल आहेत.

advertisement

शिक्षणात टॉप पण मारणे टोळीशी संपर्कात येऊन बिघडला

निलेश घायवळ हा उच्चशिक्षित असून त्याने 'मास्टर इन कॉमर्स' एम.कॉम पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. पण तो पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीत आल्यानंतर त्याला वाईट नाद लागला. मारणे टोळीत स्वत:चं वर्चस्व निर्माण केल्यानंतर त्याने मारणे टोळीशी पंगा घेत, स्वत:ची घायवळ टोळी उभी केली.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
शिक्षणात टॉप, गुन्हेगारीत टॉप, पुण्यातील घायवळ गँगचा म्होरक्या निलेश घायवळ नक्की कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल