नेमकी घटना काय?
येरवडा कारागृहातील सी. जे. विभागातील बराक क्रमांक एकमध्ये सोमवारी (१५ डिसेंबर) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडली. विशाल नागनाथ कांबळे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. येरवडा) आणि दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. कामशेत) या दोन कैद्यांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा (IPC 307) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
सावधान! रेल्वेत सामान उतरवून देतो म्हणणाऱ्यांपासून दूर राहा; तुमच्यासोबतही होऊ शकतं हे मोठं कांड
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विशाल कांबळे आणि आरोपी आकाश चंडालिया, दीपक रेड्डी हे तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. सायंकाळच्या वेळी बराकीत असताना त्यांच्यात काही कारणावरून बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर राड्यात झाले आणि रागाच्या भरात चंडालिया आणि रेड्डी यांनी तिथेच पडलेला फरशीचा मोठा तुकडा उचलून थेट विशालच्या डोक्यात घातला. मार जोरात लागल्याने विशाल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
हाणामारीचा आवाज ऐकताच कारागृह रक्षकांनी तात्काळ बराकीकडे धाव घेतली आणि आरोपींना रोखलं. गंभीर जखमी झालेल्या विशालला तातडीने कारागृह रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत
