पुणे शहरात अलीकडच्या काळात पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्यामुळे नागरिकांचे लक्ष अधिक प्रमाणात गृहबांधणीकडे वळले आहे. पुणे मेट्रोचा विस्तार, सुधारित रस्ते, नव्या टाउनशिप, आयटी पार्क्स, हेल्थकेअर सुविधा आणि शैक्षणिक संस्थांचा विस्तार या सर्व घटकांनी पुण्यातील घरबाजार अधिक आकर्षक बनवला आहे. परिणामी, शहरातील विविध भागांत परवडणारी तसेच प्रीमियम लक्झरी घरे घेण्याकडे खरेदीदारांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
advertisement
परवडणाऱ्या घरांची सरासरी किंमत
क्रेडाई पुणे आणि सीआयआय मंडळाच्या अलीकडील अहवालानुसार, पुण्यात घराची सरासरी किंमत सुमारे 71 लाख रुपये एवढी आहे. देशातील इतर महानगरांच्या तुलनेत ही किंमत तुलनेने परवडणारी मानली जाते. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी पुणे हे घर घेण्यासाठी योग्य शहर ठरत आहे. याशिवाय, शहरी वाहतूक व्यवस्थेत झालेल्या सुधारणा, रस्ते आणि कनेक्टिव्हिटीमुळे नागरिकांचे जीवनमान अधिक सुकर झाले आहे. परिणामी, परवडणारी घरे घेण्याची मागणी सातत्याने वाढत आहे.
लक्झरी घरांना वाढती पसंती
परवडणाऱ्या घरांसोबतच पुण्यात लक्झरी प्रकल्पांनाही चांगली मागणी आहे. आयटी हब असलेल्या हिंजवडी, खराडी, बाणेर, वाकड आणि बाणेर या भागांमध्ये प्रॉपर्टीची मागणी वाढली आहे. मोठ्या टाउनशिप, हाय-राईज टॉवर्स, आलिशान सोसायटीज, ग्रीन प्रोजेक्ट्स आणि अत्याधुनिक सुविधा असलेली घरे याकडे उच्च उत्पन्न गटातील नागरिक अधिक आकर्षित होत आहेत. विशेषत: आयटी क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योगपती आणि एनआरआय ग्राहकांचा कल लक्झरी घरांकडे आहे.