पुणेकरांसाठी गुड न्यूज! बाप्पांच्या दर्शनासाठी करा मेट्रोनं प्रवास, गणेशोत्सवासाठी नवं वेळापत्रक जारी
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune Metro: पुण्यातील गणपती उत्सव प्रसिद्ध असून या काळात बाप्पांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. आता गणेशभक्तांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे : येत्या काही दिवसांत गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. प्रत्येकजण बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने प्रवासी सेवांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत पुणे मेट्रो सेवा रात्री 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भूमिगत मेट्रो मार्ग सोयीचा ठरणार
गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो भाविक पुण्यात येत असतात. यंदा नुकताच सुरू झालेला जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा भूमिगत मेट्रो मार्ग या भाविकांसाठी विशेष सोयीचा ठरणार आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट ही प्रमुख स्थानके येतात आणि याच परिसरात शहरातील बहुतेक मानाची गणपती मंडळे आहेत. मेट्रो प्रशासनाच्या मते, या निर्णयामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडी टाळून थेट आणि सुरक्षितपणे गणपती मंडळांपर्यंत पोहोचता येईल. त्यामुळे यंदाचा उत्सव अधिक सुलभ होईल.
advertisement
सुधारित वेळापत्रक जाहीर
27 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत मेट्रो सेवा नियमित वेळेनुसारच धावतील. या दिवसांत सेवा सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहील.
30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 या दरम्यान मात्र सेवेत वाढ करण्यात आली आहे. या दिवसांत मेट्रो सकाळी 6 वाजता सुरू होऊन पहाटे 2 वाजेपर्यंत धावणार आहे.
advertisement
6 ते 7 सप्टेंबर 2025 या दोन दिवसांसाठी विशेष सेवा ठेवण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर 6 सप्टेंबर सकाळी 6 वाजल्यापासून ते 7 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 41 तास अखंड सेवा उपलब्ध राहणार आहे.
8 सप्टेंबर 2025 रोजी सामान्य सेवा पुन्हा सुरू होतील. गणेशोत्सव आणि महाराष्ट्र राज्योत्सव उत्सवादरम्यान भाविकांनी मेट्रो सेवेचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 22, 2025 12:26 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांसाठी गुड न्यूज! बाप्पांच्या दर्शनासाठी करा मेट्रोनं प्रवास, गणेशोत्सवासाठी नवं वेळापत्रक जारी









