कटिहार, 23 ऑक्टोबर : नवरात्रीचा उत्सव जसजसा समारोपाकडे जात आहे, तसतसा भाविकांमध्ये उत्साह अधिक वाढत आहे. भारतामध्ये देवीची अनेक मंदिरे आहे. प्रत्येकाची एक आख्यायिका आहे. आज अशाच एका तब्बल 208 वर्ष जुन्या मंदिराबाबत जाणून घेऊयात.
बिहार राज्यातील कटिहार येथे मातेचे एक खूप जुने मंदिर आहे. या मंदिराची एक वेगळी आख्यायिका आहे. येथील पूर्वजांनी केळीचा गढ कापताना ज्याठिकाणी रक्त निघाले होते, त्याच ठिकाणी इसवी सन 1815 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली.
advertisement
208 वर्षांपूर्वी बाजारालगत गद्दी घाटातील कोसी नदीतून दुर्गा मातेची एक मूर्ती बाहेर आली होती. तेव्हा पोठिया गावातील लोकांनी त्या मूर्तीला आणून पुजारीला दिली. यानंतर याठिकाणी हे ठरवण्यात आले की, ज्याठिकाणी केळीचा गढ कापल्याने रक्त निघेल, तेथे मंदिराचे निर्माण होईल.
या मंदिरात आजही बळीची प्रथा -
पंडित पुरुषोत्तम पोद्दार यांनी सांगितले की, आजही या मंदिरात बळीची प्रथा सुरू आहे. याशिवाय चारही नवरात्रांमध्ये येथे विधिनुसार पूजा केली जाते. दशमीच्या दिवशी मूर्ती विसर्जित केली जाते. या मंदिराचे आकर्षण खूपच भव्य आहे. मंदिर समितीशी संबंधित लोक पूजेच्या आयोजनात पूर्णपणे गुंतले आहेत. या मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच या मंदिरात दूरदूरवरुन लोक येतात.
बळी दिल्याने माता प्रसन्न होते आणि भाविकांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता आहे. हे मंदिर जवळपास 65 फूट विशाल आहे. विसर्जनावेळी याठिकाणी 10 हजारपेक्षा जास्त भाविक उपस्थित असतात. तरुण हातात मशाल घेऊन विसर्जनात सहभागी होतात. हे दृश्य खूपच सुंदर असते, असेही त्यांनी सांगितले.