देवघर : महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्री हा सुवर्ण दिवस मानला जातो. याच दिवशी महादेव आणि पार्वती देवीचा विवाहसोहळा पार पडला होता, असं म्हणतात. त्यामुळे या दिवशी पूजा करणं अत्यंत खास असतं. परंतु या पूजेवेळी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. जसं की, पूजेत बेलपत्र, पाणी आणि धोतरा, इत्यादींचा समावेश असायलाच हवा. विशेष म्हणजे काही अशा वस्तू आहेत, ज्या महाशिवरात्रीच्या आधी तुम्हाला मिळाल्या की, तुमचं नशीब उजळलंच म्हणून समजायचं. या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत, पाहूया.
advertisement
झारखंडच्या देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात की, महादेवांच्या पूजेत बेलपत्र असणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं, असा शिवपुराणात उल्लेख आहे. सर्वसामान्यपणे तीन पानांचं बेलपत्र महादेवांना अर्पण केलं जातं, परंतु आपल्याला पाच पानांचं बेलपत्र आणि पंचमुखी रुद्राक्ष मिळालं, तर आपल्या नशिबात नसेल ते सुखसुद्धा पायाशी येऊन उभं राहील.
रस्त्यात पैसे मिळणं म्हणजे लाभ नाही, हा असतो एक मोठा संकेत, दुर्लक्ष कराल तर गमवून बसाल!
आर्थिक चणचण होते दूर
पाच पानांचं बेलपत्र आणि पंचमुखी रुद्राक्ष महाशिवरात्रीला महादेवांना अर्पण करून घरातल्या तिजोरीत ठेवावं, त्यामुळे आपल्याला कधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. शिवाय घरातली नकारात्मक ऊर्जा मूळापासून नष्ट होईल, असं ज्योतिषांनी सांगितलं.
भूत असतं की नसतं? घरात जाळं तयार झालं की, समजून जायचं…
या पूजेनंतर घरात कायम सुख, समृद्धीचं वातावरण राहतं, कारण पाच पानांचं बेलपत्र आणि पंचमुखी रुद्राक्ष मिळणं दुर्मीळ मानलं जातं. या पानाचा अर्थ आहे ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश आणि आई भगवती. शिवाय महाशिवरात्रीच्या आधी आपल्याला स्वप्नात काळा साप दिसला की, आपलं भाग्य सोन्यासारखं चकाकलंच म्हणून समजायचं, कारण असा साप स्वप्नात दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं. दरम्यान, येत्या 8 तारखेला महाशिवरात्र आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
