भूत असतं की नसतं? घरात जाळं तयार झालं की, समजून जायचं...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
वास्तूशास्त्रात घरात जाळं निर्माण होणं अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे. या जाळ्यांमुळे घरात कधीच पैसे टिकत नाहीत. शिवाय भूत-प्रेत अशा नकारात्मक शक्ती घराकडे आकर्षित होतात.
दुर्गेश सिंह राजपूत, प्रतिनिधी
नर्मदापुरम : कितीही साफसफाई केली तरी जाळं तयार होतं. ही समस्या अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. मात्र ती वाटते तितकी साधीसुधी नसते. ज्या ठिकाणी दररोज लोकांचा वावर नसेल, वेळच्या वेळी साफसफाई नसेल, तिथे जाळं तयार होणं सर्वसाधारण आहे, मात्र साफसफाई करूनही जाळं तयार होत असेल तर त्याचा अर्थ वाईट होतो. जाळ्यांना राहू-केतूचं घर मानलं जातं. त्यामुळे जिथे जाळे असतात तिथे दारिद्र्य वसतं.
advertisement
ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्तूशास्त्रात घरात जाळं निर्माण होणं अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे. या जाळ्यांमुळे घरात कधीच पैसे टिकत नाहीत. शिवाय भूत-प्रेत अशा नकारात्मक शक्ती घराकडे आकर्षित होतात. त्यांचाही वास घरात निर्माण होतो. अशा शक्तींच्या घोळक्यात राहताना घरातल्या प्रत्येक व्यक्तीला असह्य अशा अडचणींचा सामना करावा लागतो.
advertisement
ज्या घरात साफसफाई नसते तिथे राहू-केतू वास करतात. त्यातूनच जाळं तयार होतं. राहू-केतूचा प्रभाव थेट व्यक्तीच्या बुद्धीवर होतो. व्यक्तीचं मानसिक संतुलन ढासळतं, त्याचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही. मग त्याच्याबाबत एकामागून एक दुर्घटना घडतात. त्या घरात भयंकर प्रसंग उद्भवतात. कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये भरपूर वाद होतात. त्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. त्यांना वेगवेगळे आजार वेढतात. शिवाय एकदा का घरात जाळे निर्माण झाले की, लक्ष्मी देवी त्या वास्तूत वास करत नाही. त्यामुळे घर किंवा कामाचं ठिकाण वेळच्या वेळी स्वच्छ करावं.
advertisement
समृद्ध वास्तू कशी असते?
समृद्ध वास्तूत जाळ्याचा एक कणही नसतो. तिथे वेळोवेळी साफसफाई केली जाते. तिथे राहणारे लोक स्वतःला आणि आपल्या वास्तूला नीटनेटकं ठेवतात. परिणामी त्यांच्यावर राहू-केतूची चांगली दृष्टी पडते आणि ते आर्थिक भरभराटीत सुदृढ आयुष्य जगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Madhya Pradesh
First Published :
February 21, 2024 10:18 PM IST


