सोलापुरातील श्री संत सेना नाभिक दुकानदार संघाच्या वतीने 2000 सालापासून ही अखंड वारकरी सेवा सुरू आहे. संजयकुमार कांती व पांडुरंग चौधरी यांनी एका लिंबाच्या झाडाखाली बसून वारकऱ्यांच्या सेवेला सुरुवात केली होती. गेल्या 25 वर्षापासून नाभिक सेवा वारकऱ्यांची सेवा करत आहे. जवळपास 100 नाभिक आपले दुकाने बंद करून वारकऱ्यांची सेवा करत असतात. नाभिक बांधवांना पंढरीच्या वारीला जाणे शक्य नाही. विठ्ठलाच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करून एक वेगळे समाधान नाभिक बांधवांना मिळतो, असे कांती सांगतात.
advertisement
Ashadhi Wari 2025: 5 हजार भाकऱ्या, 200 किलो तांदळाचा भात, सोलापुरात भाविकांसाठी महाप्रसाद, Video
संत सेना महाराज यांन आम्ही आराध्य मानतो. ते उत्तर प्रदेशातील माधवगड येथे होते. पंढरीच्या वारीसाठी ते महाराष्ट्रात येत. तेव्हा ते वारकऱ्यांची सेवा करायचे. त्यासाठी आम्ही देखील वारकऱ्यांची सेवा सुरू केली. श्री गजानन महाराज यांच्या दिंडीतील सर्व वारकऱ्यांची दाढी कटिंग मोफत केली जाते. तसेच त्यांच्या पायाची मालिश, कपडे धुणे, चप्पल, बूट पॉलिश संस्थेच्या वतीने केली जाते, असेही अभयकुमार कांती यांनी सांगितले.
सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून मंडप, कटिंग करण्यासाठी लागणारे टेबल आणि खुर्च्या यांची देखील सोय करण्यात येते. महत्त्वाचं म्हणजे कुठेही वर्गणी न मागता अखंडपणे वारकऱ्यांची सेवा श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेकडून करण्यात येते. तसेच उपलप मंगल कार्यालय समोर अनेक व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था आपले योगदान देत असतात. यंदाही वारीचा हाच उत्साह कायम आहे.