Vastu Tips: अंघोळीच्या पाण्यात या गोष्टी मिसळण्याचे फायदे अनेक; दिवसभरातील कामांमध्ये मोठा लाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार, योग्य पद्धतीनं केलेली अंघोळ शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवते. अनेक ठिकाणी तर अंघोळीच्या पाण्यात मीठ किंवा औषधी वनस्पतींसारख्या गोष्टी मिसळल्या जातात. यामुळे शरीराचा आळस दूर होतो, मनात सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुशास्त्रानुसार...
मुंबई : आंघोळ ही दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गोष्ट आहे. काही लोक तर एक दिवसही आंघोळीशिवाय राहू शकत नाहीत. आपल्याकडे अंघोळ करणं हे फक्त शरीर स्वच्छ करण्यापुरतं मर्यादित नसतं, त्यासोबत मनातील नकारात्मक ऊर्जासुद्धा दूर होते. वास्तुशास्त्रानुसार, योग्य पद्धतीनं केलेली अंघोळ शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवते. अनेक ठिकाणी तर अंघोळीच्या पाण्यात मीठ किंवा औषधी वनस्पतींसारख्या गोष्टी मिसळल्या जातात. यामुळे शरीराचा आळस दूर होतो, मनात सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुशास्त्रानुसार अंघोळीच्या पाण्यात कोणत्या 5 गोष्टी मिसळल्यानं पैसा, नशीब आणि प्रगती प्राप्त होऊ शकते, ते आपण पाहूया.
काळे मीठ - वास्तुशास्त्रानुसार, काळे मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. जेव्हा हे अंघोळीच्या पाण्यात मिसळलं जातं, तेव्हा मनाचा जडपणा आणि थकवा कमी होऊ लागतो. यामुळे दिवसाची सुरुवात हलकी आणि सकारात्मक वाटते.
गंगाजल - हिंदू धर्मात गंगाजलाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. अंघोळीच्या पाण्यात याचे काही थेंब टाकल्यानं स्नान शुद्ध होतं. यामुळे मन शांत राहतं आणि मनातील नकारात्मक विचार दूर होतात, असं मानलं जातं
advertisement
तुळशीची पाने - हिंदू धर्मात तुळशीला पूजनीय, श्रीहरींची प्रिय आणि माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तुळशीच्या पानांना सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, अंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाने टाकल्यानं मानसिक तणावापासून आराम मिळतो आणि मन स्थिर राहतं. हा उपाय घरातील वातावरण चांगलं राखण्यासही मदत करतो.
advertisement
कडुनिंबाची पाने - वास्तुशास्त्रात कडुनिंबाला अत्यंत शुद्ध मानलं गेलं आहे. कडुनिंब जितका औषधी गुणांनी समृद्ध आहे, तितकेच त्याचे आध्यात्मिक गुणही महत्त्वाचे मानले जातात. असं म्हणतात की कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात मिसळल्यानं नकारात्मकता दूर होते आणि शरीरात दिवसभर उत्साह टिकून राहतो.
केसर - वास्तुशास्त्रात केशरला खूप महत्त्व आहे. वास्तूनुसार केशराचा संबंध सुख-समृद्धीशी आहे, अंघोळीच्या पाण्यात थोडं केशर मिसळल्यानं मन प्रसन्न राहतं आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 2:01 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: अंघोळीच्या पाण्यात या गोष्टी मिसळण्याचे फायदे अनेक; दिवसभरातील कामांमध्ये मोठा लाभ











