'परदेशी' व्यक्तीकडून पुणेकरांना वाहतुकीचे धडे! फुटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांना रोखलं; मग..., व्हिडिओ व्हायरल

Last Updated:

पादचाऱ्यांसाठी असलेल्या फूटपाथवरून दुचाकी नेणाऱ्यांना हा व्यक्ती रोखत आहे. मात्र अनेक चालक त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

फुटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांना रोखलं
फुटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांना रोखलं
पिंपरी-चिंचवड: 'पुणे तिथे काय उणे' असं म्हटलं जातं. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओने पुणेकरांच्या वाहतूक शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निलख येथील रक्षक चौकात एक परदेशी नागरिक चक्क रस्त्यावर उतरून वाहनचालकांना वाहतुकीचे नियम शिकवताना दिसत आहे. पादचाऱ्यांसाठी असलेल्या फूटपाथवरून दुचाकी नेणाऱ्यांना हा व्यक्ती रोखत आहे. मात्र अनेक चालक त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
या संदर्भात सांगवी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी माहिती दिली की, रक्षक चौकात सध्या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे पाच पदरी रस्ता अचानक एका लेनमध्ये रूपांतरित होतो आणि तिथे मोठी वाहतूक कोंडी होते. औंध मिलिटरी स्टेशनच्या बाजूला फूटपाथ मोठा असून रस्ता अरुंद आहे. त्यामुळे घाईत असलेले वाहनचालक फूटपाथचा वापर करतात. "काही नागरिक स्वतःहून पोलिसांना मदत करत वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करतात, आम्ही त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत करतो. फूटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांवर आम्ही नियमित कारवाई करत आहोत," असे पाचोरकर यांनी सांगितले.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Informed (@informed.in)



advertisement
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पुणेकर वाहनचालकांसह प्रशासनावरही कडक शब्दात टीका केली आहे. एका युजरने संताप व्यक्त करत म्हटले की, "एकेकाळी इंग्रजांना वाटायचे की ते आपल्याला 'सुसंस्कृत' करत आहेत. आज एका परदेशी व्यक्तीला आपल्याला नियम शिकवावे लागत आहेत, हे पाहून कोणत्याही स्वाभिमानी वाहतूक आयुक्तांना लाज वाटली पाहिजे."
व्हायरल व्हिडिओमुळे रक्षक चौकातील वाहतूक कोंडी आणि वाहनचालकांची बेफिकिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'परदेशी' व्यक्तीकडून पुणेकरांना वाहतुकीचे धडे! फुटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांना रोखलं; मग..., व्हिडिओ व्हायरल
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement