BOI Recruitment : खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरीची मोठी संधी; अंतिम तारीख काय? वाचा सविस्तर

Last Updated:

Bank of India Recruitment 2025 : बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफिसर पदासाठी 540 जागांची भरती जाहीर झाली आहे. अर्ज प्रक्रिया 20 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून पात्र उमेदवारांनी 5 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करावा.

News18
News18
बँकेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न अनेक तरुण-तरुणी पाहत असतात. अशा उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बँक ऑफ इंडियाने क्रेडिट ऑफिसर पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसंदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून अर्ज प्रक्रिया 20 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी bankofindia.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख अन् पद काय?
ही भरती GBO स्ट्रीम अंतर्गत होणार असून उमेदवारांची नियुक्ती MMGS-II, MMGS-III आणि SMG-IV या पदांसाठी केली जाणार आहे. या भरतीद्वारे एकूण 540 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीखही 5 जानेवारी 2026 असणार आहे. या भरतीसाठी 25 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
advertisement
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 64,820 ते 1,20,940 रुपया पर्यंत पगार मिळणार आहे.
जाणून घ्या पात्रता?
क्रेडिट ऑफिसर (MMGS-II) साठी उमेदवारांनी पदवीधर असणे आवश्यक असून किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा.
क्रेडिट ऑफिसर (SMG-IV) पदासाठी पदवीसह किमान 8 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
advertisement
अर्ज करण्याची पद्धत?
उमेदवारांनी पहिल्यांदा अधिकृत वेबसाइटवर जाऊन नवीन नोंदणी करावी. त्यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे. संबंधित भरती लिंकवर क्लिक करून अर्ज भरा, फोटो आणि सही अपलोड करा, शुल्क भरा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BOI Recruitment : खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरीची मोठी संधी; अंतिम तारीख काय? वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement