सोलापूरकरांनी गजानन महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात स्वागत केले. संत गजानन महाराजांनी पालखी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात का मुक्कामी असते. या संदर्भात अधिक माहिती उळे गावाचे उपसरपंच नेताजी खंडागळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
श्री संत गजानन महाराजांनी शेगावहून पंढरपूरकडे जाताना सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातच मुक्काम केला होता, असे म्हटले जाते. त्यामुळे आजही श्री संत गजानन महाराजांची पालखी उळे गावात मुक्कामी असते. यंदा मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रुफ मंडपाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गावकऱ्यांकडून तब्बल तीन ते साडेतीन हजारापर्यंत वारकरी आणि इतर नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
प्रत्येक घरातील व्यक्ती संतांची सेवा करताना या दिवशी दिसते. सकाळी गरम पाण्याची आंघोळीची सोय. गावात प्रदक्षिणा होत असल्याने दारोदारी सडा रांगोळ्या काढण्यात येणार आहे. तालुका प्रशासनाकडून वारकऱ्यांच्या आरोग्याचीही देखभाल केली जाते. इतकेच नाहीतर या दिवशी गावात विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात करण्यात येते.
उळे गावातील ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या घातले होते. पालखीसोबत जवळपास 800 ते 1 हजार वारकरी आहेत, तर पालखीचे दर्शन घेण्यासाठी 4 ते 5 हजार भाविक उळे गावात दाखल होतात. तर उळे गावात जवळपास 5 हजार भाविकांसाठी अत्यंत प्रेमाने गावकरी महाप्रसाद आणि जेवणाची व्यवस्था करतात.