Jwalamukhi Yog 2025: शनिवारचा दिवस अशुभ! अभद्र योग जुळल्यानं चुकूनही या 5 कामांना हात घालू नका

Last Updated:

Jwalamukhi Yog 2025 Date Time: या अशुभ योगात कोणतेही शुभ कार्य करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. चुकूनही तुम्ही शुभ कार्य केले, तर ते तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते, त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही. पंचांगानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी ज्वालामुखी योग तयार होत आहे.

News18
News18
मुंबई : आज शनिवारचा दिवस आहे, अर्थातच आज शनिदेव आणि हनुमानाची पूजा केली जाते. पंचागानुसार काही दिवस शुभ-अशुभ असतात. त्यानुसार आजचा दिवस अशुभ आहे. आज 20 डिसेंबर 2025 रोजी एक अत्यंत अशुभ योग तयार होत आहे, त्यात आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. या अशुभ योगात कोणतेही शुभ कार्य करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. चुकूनही तुम्ही शुभ कार्य केले, तर ते तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते, त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही. पंचांगानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी ज्वालामुखी योग तयार होत आहे. ज्वालामुखी योग सविस्तर जाणून घेऊ आणि या काळात कोणती 5 कामे करू नयेत ते पाहुया.
पंचांगानुसार, 20 डिसेंबर शनिवारी ज्वालामुखी योग सकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल. हा योग उशिरा रात्री 1 वाजून 21 ए एम पर्यंत राहील. सूर्योदय 07:09 ए एम ला झाल्यानंतर थोड्याच वेळात हा अशुभ योग सुरू होईल आणि तो दिवसभर कायम राहील. त्यामुळे 20 डिसेंबर रोजी दिवसभर कोणतेही शुभ कार्य करता येणार नाही.
advertisement
ज्वालामुखी योगाच्या नावावरूनच आपण समजू शकतो की, जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा तो आसपासच्या परिसरात तबाही माजवतो आणि त्याच्या मुखातून धधकता लाव्हा बाहेर पडतो, जो इतरांसाठी अशुभ असतो. पंचांगानुसार, ज्या दिवशी प्रतिपदा तिथी आणि मूळ नक्षत्र असते तसेच धनु राशी असते, तेव्हा ज्वालामुखी योग तयार होतो.
20 डिसेंबर रोजी पौष शुक्ल प्रतिपदा तिथी 07:12 ए एम पासून सुरू होईल आणि दिवसभर असेल. तसेच मूळ नक्षत्र पहाटेपासून ते उशिरा रात्री 01:21 ए एम पर्यंत आहे. या दिवशी धनु राशीत चंद्र आणि सूर्य असतील. या सर्व कारणांमुळे वर्षाच्या शेवटच्या 20 तारखेला ज्वालामुखी योग तयार होत आहे.
advertisement
ज्वालामुखी योगात काय करू नये?
ज्वालामुखी योगाच्या काळात कदापि विवाह करू नये, नवविवाहित दांपत्यासाठी अशुभ ठरते. शुक्रास्त झाल्यामुळे तसेही विवाह होणार नाहीत.
ज्वालामुखी योगात कोणीही आपल्या नवीन घरात गृहप्रवेश करू नये. हे त्या घराच्या आणि कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी शुभ मानले जात नाही.
advertisement
ज्वालामुखी योग असेल, त्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करू नये. तुम्हाला दुकान सुरू करायचे असेल, नवीन नोकरीत रुजू व्हायचे असेल किंवा एखादा नवीन प्रकल्प सुरू करायचा असेल, तर त्या दिवशी हा योग नाही ना हे तपासून घ्यावे.
ज्वालामुखी योगात गर्भधारणा, मुंज, मुंडन यांसारखे शुभ संस्कार करू नयेत. ही सर्व कामे वर्जित मानली जातात. या योगात शेतीची पेरणी सुद्धा करत नाहीत. ज्वालामुखी योगामध्ये जमीन, वाहन, दुकान, घर किंवा फ्लॅट इत्यादींची खरेदी करू नये.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Jwalamukhi Yog 2025: शनिवारचा दिवस अशुभ! अभद्र योग जुळल्यानं चुकूनही या 5 कामांना हात घालू नका
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement