दारात पाण्याचं भांडं ठेवा - हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपायांपैकी एक आहे. दररोज सकाळी जेव्हा घरातील कोणी कामासाठी किंवा ऑफिससाठी निघणार असेल, दरवाजाबाहेर एका भांड्यात पाणी भरून ठेवा. ज्योतिषशास्त्रानुसार असं मानलं जातं की पाणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. ती व्यक्ती बाहेर जाताच, ते पाणी घरापासून दूर असलेल्या कोणत्याही झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत घालावे. दृष्ट लागण्याचा त्रास होणार नाही आणि घरासोबतच व्यवसायाचे ठिकाणही सुरक्षित राहते.
advertisement
दुकान किंवा ऑफिसमध्ये कापूर आणि लवंग जाळा - व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचल्यावर एक छोटा पण शक्तिशाली उपाय करा - एका वाटीत कापराचा तुकडा आणि नऊ लवंगा ठेवून जाळा. त्याचा धूर संपूर्ण परिसरात पसरू द्या. कापूर वातावरण शुद्ध करतो, तर लवंग नकारात्मक शक्तींना दूर पळवते. हा धूर सकारात्मक ऊर्जा वाढवतो, ज्यामुळे ग्राहकांचे आकर्षण वाढते आणि व्यवसायात नफा मिळतो.
धनवर्षा करेल तुळस! घराची लक्ष्मी मानून नित्य या गोष्टी केल्यानं सुख-शांती-धनलाभ
इतर प्रभावी ज्योतिषीय उपाय - दुकान किंवा ऑफिसच्या दारावर लिंबू, अख्खी लाल मिरची आणि मीठ यांची माळ टांगा. ती सुकल्यावर लगेच नवीन माळ लावा. हा उपाय नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो.
घरातून निघण्यापूर्वी किंवा दुकानात स्पीकरवर हनुमान चालीसाचे पठण करा. हनुमान नकारात्मक शक्तींचा नाश करणारा मानला जातो.
दुकान किंवा गल्ल्याजवळ (पैसे ठेवण्याची जागा) काळ्या धाग्यात सात लवंगा बांधून लटकवा. व्यवसाय-धंद्याला कोणाची दृष्ट लागणार नाही.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
