तुळशीची माळ धारण करण्याचे फायदे -
तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. तुळशीच्या जपमाळेनं जप केल्यानं किंवा तुळशीची जपमाळ धारण केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुख-समृद्धी येते.
धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीला भगवान विष्णूची प्रिय मानले जाते. तुळशीच्या माळेने भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करावा.
तुळशीची माळ धारण केल्यानं व्यक्तीला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. विष्णू कृपेनं व्यक्तीच्या कुटुंबात आनंद येतो.
advertisement
मान्यतेनुसार, तुळशीची माळ धारण केल्याने बुध आणि शुक्र ग्रह मजबूत होतात. यामुळे मनही शांत राहते.
तुळशीची माळ घालण्याचे नियम -
तुळशीची जपमाळ धारण करण्यापूर्वी ही जपमाळ गंगाजलाने शुद्ध केली जाते. यानंतर तुळशीमातेच्या मंत्रांचा जप केला जातो आणि त्यानंतर माळ घातली जाते.
तुळशीची माळ धारण करणाऱ्या व्यक्तीला सात्विक भोजन करावे लागते. तुळशी माळ धारण करणारी व्यक्ती मद्यपान करू शकत नाही किंवा तामसिक आहार घेऊ शकत नाही.
फेब्रुवारीमध्ये 4 मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन! या 6 राशींचे भाग्य उजळणार
तुळशीची माळ धारण करणाऱ्यांना रुद्राक्ष धारण करण्यास मनाई आहे. दोन्ही प्रकारच्या माळा एकत्र घालणे योग्य मानले जात नाही.
तुळशीच्या माळेची रोज पूजा केली जाते आणि एकदा ही माळ धारण केल्यानंतर काढू नये, असे सांगितले जाते. सकाळी नैसर्गिक विधीपूर्वी माळा काढली जाते आणि आंघोळीनंतर पुन्हा घालतात.
असे मानले जाते की, ज्यांना गळ्यात तुळशीची माळ घालण्यास अडचण आहे त्यांनी उजव्या हातावर बांधांवी.
प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
