TRENDING:

हर हर महादेव! सातारच्या देवस्थानाची जगात ख्याती; श्रावण सुरू झालाय, तुम्हीही घ्या दर्शन

Last Updated:

श्रावण महिन्यात महादेवांसह विविध देवी-देवतांची पूजा केली जाते. भाविक या महिन्यात देवदर्शन करतात. प्राचीन मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, प्रतिनिधी
advertisement

सातारा : सर्वत्र हिरवळ, पावसामुळे गार वातावरण आणि सणवार, असं श्रावण महिन्याचं अतिशय प्रसन्न रूप असतं. हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित असल्यानं या काळात भाविक त्यांची अत्यंत मनोभावे पूजा करतात. विशेषतः सोमवार हा महादेवांचा वार मानला जात असल्यामुळे श्रावणी सोमवारी अनेकजण उपवास पाळतात, मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घेतात.

श्रावण महिन्यात महादेवांसह विविध देवी-देवतांची पूजा केली जाते. भाविक या महिन्यात देवदर्शन करतात. प्राचीन मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतात. सातारा जिल्ह्याला जेवढं भरभरून नैसर्गिक सौंदर्य लाभलंय, तेवढाच प्राचीन वस्तूंचा ठेवा याठिकाणी आहे. सातारा शहराच्या पश्चिमेस सुमारे 10 किलोमीटर अंतरावर यवतेश्वर हे डोंगराच्या कुशीत वसलेलं लहानसं गाव. या गावात श्री शंभू महादेवांचं मंदिर आणि शेजारी ग्रामदैवत काळभैरवनाथाचं देवस्थान आहे. महादेवांचं मंदिर यादवकालीन असल्याचं बोललं जातं.

advertisement

हेही वाचा : श्रावणासोबत 5 राशींचा गोल्डन काळ सुरू! बुध ग्रह उलट होतोय, त्याची कृपा तुमच्यावर

या मंदिरात मोठं शिवलिंग आहे. गाभाऱ्यासमोर दगडात कोरलेले 2 सुंदर नंदी आहेत. मंदिराभोवती भक्कम दगडी तटबंदी आहे. या तटबंदीच्या दक्षिणेकडील भिंतीत 1 वीरगळ ठेवला आहे. मंदिरासमोर 1 मोठी दीपमाळ असून मंदिराच्या आवारात काही देवी-देवतांच्या मूर्तींचं दर्शन होतं. मंदिराच्या पश्‍चिमेकडील पिण्याच्या पाण्याचे तळे देवतळे म्हणून ओळखले जाते. या तळ्यांची बांधणी जांभ्या दगडातील असून सध्या या तलावात जास्त पाणी टिकत नाही, असं म्हणतात.

advertisement

यवतेश्वर डोंगराची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 1230 मीटर आहे. सभोवताली गर्द झाडी, मोकळी, प्रसन्न हवा यामुळे इथलं वातावरण अल्हाददायी असतं. डोंगरावरून सातारा शहराचं विहंगम दृश्‍य आणि अजिंक्‍यताऱ्याची दर्शनी बाजू दिसते. साताऱ्यातून अर्ध्या तासावर असलेल्या याठिकाणी जाण्यासाठी एसटी, आणि खासगी वाहनाची सोय आहे. दरम्यान, या मंदिराची जगभरात ख्याती असल्यानं इथं भाविकांची गर्दी असते, श्रावण महिन्यात तर महादेवांचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं इथं हजेरी लावतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

श्री शंभू महादेवांचं मंदिर

मराठी बातम्या/अध्यात्म/
हर हर महादेव! सातारच्या देवस्थानाची जगात ख्याती; श्रावण सुरू झालाय, तुम्हीही घ्या दर्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल