अयोध्या : वर्षाचा दुसरा महिना आता संपण्याच्या वाटेवर आहे. आठवड्याभरात मार्च महिना उजाडेल. ज्योतिषशास्त्रात या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण याच महिन्यात मोठमोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. त्यातून विविध ग्रहांची युती होईल, अर्थातून या युतीमधून अनेक शुभ योग निर्माण होतील.
ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिन्यात बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन होणार आहे. तर, बुध आणि शनी ग्रह अस्त अवस्थेतून उदय अवस्थेत जाणार आहेत. सर्वात आधी 7 मार्च रोजी बुध ग्रहाचा मीनप्रवेश होईल. तिथं राहू आणि केतू आधीपासूनच विराजमान आहेत. तर, 12 फेब्रुवारीला शुक्र ग्रह कुंभ राशीत जाईल. त्यानंतर 14 फेब्रुवारीला सूर्य ग्रहाचा कुंभ राशीतून मीनप्रवेश होईल. 15 मार्च आणि 18 मार्च रोजी बुध ग्रहाचा मीन राशीत आणि शनी ग्रहाचा कुंभ राशीत उदय होईल. याचा सर्व राशींवर प्रभाव पाहायला मिळेल.
advertisement
'या' व्यक्तींचं नशीब उजळेल!
अयोध्येचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात मोठमोठे ग्रह आपली स्थिती आणि चाल बदलणार आहेत. 7 मार्चला गुरू, 12 मार्चला शुक्र आणि 14 मार्चला सूर्याचं राशीपरिवर्तन होईल. तर, 15 आणि 18 मार्चला बुध ग्रहाचा मीन राशीत उदय होईल. ग्रहांच्या या स्थितीबदलचा सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येईल. त्यातून काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक अनुभव येतील, तर काही राशींच्या व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. 4 राशी अशा आहेत, ज्यांचं भाग्य अगदी उजळून निघेल.
रस्त्यात पैसे मिळणं म्हणजे लाभ नाही, हा असतो एक मोठा संकेत, दुर्लक्ष कराल तर गमवून बसाल!
मेष : आपल्यासाठी मार्च महिना उत्तम असणार आहे. याच काळात आपली आर्थिक स्थिती भक्कम होईल. ठरवलेली सर्व कामं पूर्ण होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. उत्पन्नवाढीची शक्यता आहे.
वृषभ : आपल्याला मार्च महिन्यात अनेक शुभवार्ता कळतील. धनलाभाचा योग आहे. कार्यक्षेत्रात यश मिळेल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे आता आपल्याला परत मिळतील. विवाह जुळण्याचा योग आहे. दाम्पत्य जीवनात सुख येईल.
कन्या : मार्च महिन्यात आपल्याला भाग्याची उत्तम साथ मिळेल. पाठीशी लागलेले सर्व वाद-विवाद मिटतील. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या अडचणी मूळापासून संपतील. समाजात आपला मान-सन्मान वाढेल.
कर्क : मार्च महिन्यात आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळू शकते, व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. एकूणच या महिन्यात भाग्याचा साथीने आपली आर्थिक स्थिती भक्कम होईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
