महाशिवरात्रीला रुद्राक्ष घालणार असाल, तर 'या' गोष्टी ठेवा ध्यानात; नाहीतर नको त्या अडचणी लागतील पाठी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
रुद्राक्षासोबत व्यक्तीला काही नियमांचं पालनही करावं लागतं. नाहीतर रुद्राक्षामुळे आयुष्यात जेवढी भरभराट होते, त्याच्या दुप्पटीने अडचणींचा सामना करावा लागतो.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : महाशिवरात्री म्हणजे महादेवांना प्रसन्न करण्याची सुवर्णसंधी. त्यामुळे आता काहीच दिवसांवर असलेल्या महाशिवरात्रीची भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 8 मार्च रोजी हा सण साजरा केला जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, याच तिथीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यामुळे शुभ कार्यांसाठी हा दिवस उत्तम मानला जातो. शिवाय आयुष्यात सुख, समृद्धी यावी यासाठी या दिवशी विविध उपाय केले जातात.
advertisement
रुद्राक्ष हा महादेवांचा अंश आहे, असं धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितलंय. त्यांच्या अश्रूंमधून त्याची उत्पत्ती झाली होती, असं म्हणतात. त्यामुळे रुद्राक्ष परिधान केल्याने महादेवांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो, अशी मान्यता आहे. अमावस्या, पौर्णिमा, श्रावणी सोमवार आणि शिवरात्री हे रुद्राक्ष परिधान करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहेत. तुम्ही येत्या महाशिवरात्रीला रुद्राक्ष परिधान करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्याचसाठी आहे. कारण रुद्राक्षासोबत व्यक्तीला काही नियमांचं पालनही करावं लागतं. नाहीतर रुद्राक्षामुळे आयुष्यात जेवढी भरभराट होते, त्याच्या दुप्पटीने अडचणींचा सामना करावा लागतो.
advertisement
जिथं श्रीरामांचं भव्य मंदिर वसलंय, त्या अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, रुद्राक्ष मनगटात किंवा गळ्यात घालणं शुभ असतं. जर नियमांनुसार रुद्राक्ष घातलं तर महादेवांसह देवी पार्वतीचा आशीर्वादही सदैव आपल्या पाठीशी राहतो. परंतु परिधान करण्यापूर्वी रुद्राक्ष दूधाने किंवा मोहरीच्या तेलाने स्वच्छ धुवून घ्यावं. त्यानंतर ते परिधान करताना महादेवांच्या अमोघ मंत्राचा जप करावा.
advertisement
'या' गोष्टी ठेवा ध्यानात
- तुम्ही रुद्राक्ष हातात घालणार असाल, तर ते काळ्या धाग्यात कधीच गुंफू नये.
- कोणालाही भेटवस्तू म्हणून रुद्राक्ष देऊ नये किंवा कोणाकडून घेऊही नये.
- एकदा रुद्राक्ष परिधान केलं की, त्यानंतर कधीच कोणतंही व्यसन करू नये, मांसाहारापासून दूर राहावं.
- रुद्राक्ष घालून स्मशानभूमीत किंवा जिथं व्यक्तीवर अंत्यसंस्कार होतात, अशा कोणत्याच ठिकाणी जाऊ नये.
- जिथं नवजात बाळ असेल तिथं रुद्राक्ष घालून जाऊ नये.
- मासिकपाळीदरम्यान महिलांनी रुद्राक्ष परिधान करू नये.
- रुद्राक्ष वेळोवेळी गंगेच्या पाण्याने धुवावं, ज्यामुळे त्याची शुद्धता कायम राहते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
February 25, 2024 10:55 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
महाशिवरात्रीला रुद्राक्ष घालणार असाल, तर 'या' गोष्टी ठेवा ध्यानात; नाहीतर नको त्या अडचणी लागतील पाठी!


