अयोध्या, 19 सप्टेंबर : आज सर्वत्र अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झाला आहे. आता 10 दिवस आपल्याकडे बाप्पाचा मुक्काम असेल. भाविक प्रेमाने त्याचा पाहुणचार करतील.
राशींनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि विचार करण्याची पद्धत बदलते. ज्योतिषशास्त्रानुसार, भाविकांनी गणेशोत्सवात आपल्या राशींनुसार विविध मंत्रांचा जप करायला हवा. यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि सुखाची भरभराट होईल. अयोध्येचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की यांनी प्रत्येक राशीच्या व्यक्तींसाठी उपयुक्त असे मंत्र सांगितले आहेत. पाहूया आपल्या राशीसाठी कोणता मंत्र आहे.
advertisement
मेष : आपण ‘ओम वक्रतुण्डाय हूं’ या मंत्राचा जप करावा.
बाप्पाला राशींनुसार अर्पण करा वस्तू, सुखाचा होईल वर्षाव, मिळेल धनसंपत्ती
वृषभ : आपण ‘ओम हीं ग्रीं हीं’ या मंत्राचा जप करावा.
मिथुन : आपण ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा 'श्रीगणेशाय नम:' या मंत्राचा जप करावा.
कर्क : आपण ‘ओम वक्रतुण्डाय हूं’ किंवा 'ओम वरदाय नम:' या मंत्राचा जप करावा.
सिंह : आपण ‘ओम सुमंगलाये नम:' या मंत्राचा जप करावा.
कन्या : आपण ‘ओम चिंतामण्ये नम:' या मंत्राचा जप करावा.
तूळ : आपण ‘ओम वक्रतुण्डाय नम:' या मंत्राचा जप करावा.
वृश्चिक : आपण ‘ओम नमो भगवते गजाननाय' या मंत्राचा जप करावा.
धनू : आपण ‘ओम गं गणपते मंत्र' या मंत्राचा जप करावा.
मकर : आपण ‘ओम गं नम:' या मंत्राचा जप करावा.
कुंभ : आपण ‘ओम गण मुक्तये फट्' या मंत्राचा जप करावा.
मीन : आपण ‘ओम गं गणपतये नमः' किंवा ‘ओम अंतरिक्षाय स्वाहा’ या मंत्राचा जप करावा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)