गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आदित्य जोशी गुरुजी (बोरिवली) यांनी गुरुपौर्णिमा साजरी का केली जाते? भगवान शंकर, व्यास ऋषी याची पौराणिक कथेनुसार ही गुरुपरंपरा कशी सुरू झाली याबद्दल लोकल18 सोबत बोलताना सांगितलं आहे.
Nag Panchami: 32 शिराळ्यात पुन्हा सुरू होणार जिवंत नागाची पूजा? काय आहेत शिराळकरांच्या भावना? Video
भगवान शंकर आणि सप्तर्षी
advertisement
पुराणकथांनुसार, आदियोगी भगवान शंकर हे जगाचे पहिले गुरू मानले जातात. शंकर भगवान दीर्घ काळ योगनिद्रेत गेले होते. त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी सप्तर्षींनी हजारो वर्षे तप केले. अखेर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी सप्तर्षींना योग, ध्यान व आत्मज्ञान याचे दिव्य शिक्षण दिले. याच दिवशी गुरुपौर्णिमेचा आरंभ झाला, असे मानले जाते. म्हणूनच हा दिवस संपूर्ण जगात ‘गुरूंच्या स्मरणाचा दिवस’ म्हणून पवित्र मानला जातो.
याचबरोबर, महर्षी व्यासांचे या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्यांनी वेदांचे वर्गीकरण, महाभारताचे लेखन, आणि अनेक पुराणांचे संकलन केले. त्यामुळे त्यांना ‘व्यासदेव’ किंवा ‘आदिगुरू’ मानले जाते. म्हणूनच या दिवशी व्यास पूजनाची परंपरा आहे आणि या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ असंही म्हणतात.
गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी?
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान, गुरूंची पूजा, मंत्रजप, ध्यान, आणि दानधर्म याचे विशेष महत्त्व असते. शिष्य आपल्या गुरूला भेट देतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि जीवनात नवे संकल्प करतात. काही ठिकाणी सार्वजनिक कीर्तन, प्रवचन आणि ध्यानसत्रांचं आयोजन देखील केलं जातं.