मुंबई : हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी या सणाला विशेष असे महत्त्व देण्यात आले आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे यंदाचा कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्त काय आहे आणि कशी पूजा करावी याबद्दलच आपल्याला मुंबईतील पौराणीक विद्या अभ्यासक सूरज सदानंद म्हाशेळकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
काय आहे मुहूर्त?
श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री ठीक 12 वाजता कंसाच्या बंदिवासात भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म झाला. श्रीविष्णूंनी आठवा अवतार श्रीकृष्णांच्या रुपात घेतला. श्रीकृष्ण जयंती ही संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. श्रावण अष्टमीला रात्री कृष्णजन्मावेळी बाळकृष्णाची विधिवत पूजन केले जाते, असं सूरज सदानंद म्हाशेळकर सांगतात.
गणेशोत्सवासाठी एक खिडकी योजना! पुण्यातील या मंडळांना विनाशुल्क परवानगी
सोमवार 26 ऑगस्ट 2024 रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होत आहे. अष्टमी तिथीला श्री कृष्णाचं जन्म झाला म्हणून कृष्णाष्टमी तीच गोकुळाष्टमी या वर्षी 26 आणि 27 ऑगस्ट रोजी ही तिथी आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे शुभ मुहूर्त 26 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजून 1 मिनिटांपासून 12 वाजून 45 मिनिटांपर्यंत असेल. या 44 मिनिटांच्या कालावधीत कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल, असं सूरज सदानंद म्हाशेळकर सांगतात.
जन्माष्टमीला अर्पण करा खास नैवेद्य; खूश होईल कान्हा, आयुष्यात येईल सुख-समृद्धी!
कशी करावी पूजा?
उपवासाच्या पूर्व रात्री हलकं भोजन करावं आणि ब्रह्मचर्याचे पालन करावं. तसेच उपवासाच्या दिवशी सकाळी नित्य कर्मांहून निवृत्त होऊन शुद्ध पाण्याने स्नान करावे. नंतर प्रभू श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून श्री कृष्ण जयंतीला कृष्णाचं पंचामृताने अभिषेक करावा. तुळशी जल अभिषेक करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. 56 भोग नैवेद्य असेल तर अर्पण करावा. प्रिय नैवेद्य लोणी साखर अर्पण करावा. अशा प्रकारे पूजन करू शकता, असंहा सूरज सदानंद म्हाशेळकर सांगतात.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.





