मार्केट कोसळलं! लग्नाळूंसाठी मोठी गूड न्यूज, वेडिंग सीजनमध्ये सोनं-चांदीच्या दरात धक्कादायक घसरण; पाहा किमती
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अमावस्या संपताच लग्नाचे मुहूर्त जवळ आले आहेत आणि अशातच सोन्या-चांदीच्या किमतीत झालेली ही ऐतिहासिक पडझड लगीनघाई असलेल्या कुटुंबांसाठी मोठी 'गुड न्यूज' ठरली आहे.
Gold Market : 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आणि सराफा बाजारात जणू भूकंपाचे धक्के जाणवले. अमावस्या संपताच लग्नाचे मुहूर्त जवळ आले आहेत आणि अशातच सोन्या-चांदीच्या किमतीत झालेली ही ऐतिहासिक पडझड लगीनघाई असलेल्या कुटुंबांसाठी मोठी 'गुड न्यूज' ठरली आहे.
सोन्या-चांदीच्या दरात घसरण 'मेटल मार्केट'मध्ये भूकंप
बजेट सादर झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोन्या-चांदीच्या दरांनी तळ गाठला आहे. जागतिक बाजारातील 'वॉर्श इफेक्ट' आणि अमेरिकन डॉलरमधील मजबुतीमुळे ही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या दरात 9% ते 12% ची मोठी घसरण पाहायला मिळाली. प्रति 10 ग्रॅम ₹1,83,000 च्या विक्रमी उच्चांकावरून सोने आता ₹1,47,000 ते ₹1,51,000 च्या दरम्यान आले आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा सुमारे 30 ते 35 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. चांदीच्या दरात तर 27% ते 36% पर्यंतची ऐतिहासिक आपटी नोंदवण्यात आली आहे. प्रति किलो ₹4 लाखांच्या घरात गेलेली चांदी आता ₹2.65 लाख ते ₹2.70 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. चांदीच्या दरात एकाच आठवड्यात सुमारे ₹1.34 लाखांची घट झाली आहे.
advertisement
ऐन लग्नसराईत 'अच्छे दिन'
फेब्रुवारी 2026 हा महिना लग्नाच्या मुहूर्तांनी भरलेला आहे. फेब्रुवारीपासून शुक्र ताऱ्याचा उदय होत असल्याने लग्नाचे बँड-बाजा वाजू लागतील. फेब्रुवारीमध्ये 3, 5, 6, 7, 8, 10, 20, 25, आणि 26 अशा एकूण 9 शुभ मुहूर्तांची रेलचेल आहे. सामान्यतः लग्नासाठी किमान 5 ते 10 तोळे सोने खरेदी केले जाते. सोन्याचा भाव 35 हजारांनी कमी झाल्यामुळे 5 तोळे सोने खरेदी करणाऱ्या कुटुंबाची थेट ₹1.75 लाख रुपयांची बचत होणार आहे. हा पैसा लग्नातील इतर खर्चासाठी वापरता येईल. चांदीच्या दागिन्यांना मागणी: चांदी 1.34 लाखांनी स्वस्त झाल्यामुळे लग्नातील भेटवस्तू, चांदीची भांडी आणि पैंजण यांसारख्या वस्तूंच्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. जे मध्यमवर्गीय कुटुंब चांदीच्या भाववाढीमुळे चिंतेत होते, त्यांना या घसरणीने मोठा आधार दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 6:23 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
मार्केट कोसळलं! लग्नाळूंसाठी मोठी गूड न्यूज, वेडिंग सीजनमध्ये सोनं-चांदीच्या दरात धक्कादायक घसरण; पाहा किमती










