शाजापूर: महादेव आणि देवी पार्वतीच्या लग्नाचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री आता अवघ्या काही दिवसांवर आहे. या दिवशी महादेवांचा आशीर्वाद मिळवण्याची सुवर्ण संधी असते, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाचा हा दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत खास असणार आहे. कारण या राशीच्या व्यक्तींना प्रचंड लाभ मिळणार आहे.
चंद्रामुळे दिवस होईल खास!
ज्योतिषी पंडित शिवनारायण चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्सव आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला सर्व शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळते. यंदाची महाशिवरात्री कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी विशेष फलदायी असणार आहे. कारण या महाशिवरात्रीला चंद्र कुंभ राशीत असेल. त्याचाच फायदा कुंभ राशीच्या व्यक्तींना मिळेल. मात्र त्यासाठी त्यांनी काही उपाय करणं आवश्यक आहे.
advertisement
(करियरपासून, व्यवसायापर्यंत सारं चमकेल; या महिन्यात 3 राशींसाठी राजयोग!)
काय उपाय करावे?
ज्योतिषांनी सांगितलं की, जर तुमची रास कुंभ असेल तर महाशिवरात्रीच्या प्रदोष कालात म्हणजेच सूर्यास्ताच्या 45 मिनिटे आधी, महादेवांना पांढरी फुलं, पांढरी मोहरी, दुधात मध आणि अबीराचा अभिषेक करा. असं केल्यास तुम्हाला सात दिवसात सर्व शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळेल.
(राहू आणि शुक्र 18 वर्षांनी येणार एकत्र; गुरूच्या राशीत होणार युती! तुमची रास कोणती?)
इतर राशींच्या व्यक्तींसाठी उपाय
एखाद्या व्यक्तीने महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठून, स्नान करून, शिवमंदिरात महादेवांचा 'ॐ' हा एक अक्षरी मंत्रजप 108 वेळा केला आणि सोबतच दूध, दही, मध, तूप आणि साखर मिसळून अभिषेक केल्यास तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अभिषेक करताना 'त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ॐ हौं जूं सः' हा मंत्र जप करावा.
नेमकं काय फळ मिळेल?
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्यास अनेक आशीर्वाद मिळतात. परंतु विशेषत: अविवाहितांच्या लग्नाचा योग जुळून येईल. शिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील, असं ज्योतिषांनी सांगितलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
