करियरपासून, व्यवसायापर्यंत सारं चमकेल; या महिन्यात 3 राशींसाठी राजयोग!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
या महिन्यात 2 मोठ्या ग्रहांच्या युतीतून बुधादित्य योग निर्माण होतोय. या राजयोगाचा ज्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल. त्या राशींच्या व्यक्तींचं नशीबच पालटेल.
परमजीत कुमार, प्रतिनिधी
देवघर : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन करतो. या महिन्यात तर अनेक ग्रहांचं राशीपरिवर्तन होणार आहे. ज्यातून काही राजयोग निर्माण होतील. अर्थातच या राजयोगांमुळे काही राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळून निघेल.
मार्चमध्ये 2 मोठ्या ग्रहांच्या युतीतून बुधादित्य योग निर्माण होतोय. या राजयोगाचा ज्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल. त्या राशींच्या व्यक्तींचं नशीबच पालटेल. याबाबत ज्योतिषी काय सांगतात पाहूया.
advertisement
झारखंडची राजधानी असलेल्या देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित आनंद किशोर मुद्गल सांगतात की, या महिन्यात मीन राशीत दोन मोठ्या ग्रहांची युती होणार आहे. 7 मार्चला बुध मीन राशीत प्रवेश करेल, तर 14 मार्चला या राशीत सूर्याचा प्रवेश होणार आहे. एकाच राशीत दोन ग्रह येणं म्हणजेच त्या ग्रहांची युती होणं. आता बुध आणि सूर्याच्या युतीतून बुधादित्य योग निर्माण होणार आहे. या योगाचा खालील राशींच्या व्यक्तींना फायदाच फायदा होईल.
advertisement
वृषभ : बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होतोय. ज्यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मकता येईल. आपला व्यवसाय विस्तारेल. नोकरीत नवी जबाबदारी मिळेल. पालकांना मुलांकडून शुभवार्ता कळतील. आरोग्य उत्तम साथ देईल. वैवाहिक जीवनात सुख येईल.
कर्क : आपल्यासाठीसुद्धा हा राजयोग सुख घेऊन येणार आहे. त्यामुळे हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. नवं घर किंवा वाहन खरेदी करू शकाल. कुटुंबातील वातावरण आनंदाचं असेल. घरात शुभ कार्य पार पडेल. व्यापारात आर्थिक लाभ होईल.
advertisement
मीन : बुधादित्य राजयोगामुळे आपलं नशीब उजळून निघणार आहे. करियरमध्ये प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीत आपली पदप्रतिष्ठा वाढेल. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी स्थिती असेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
Location :
Deoghar,Jharkhand
First Published :
March 04, 2024 8:58 PM IST


