त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे काय?
पितृ दोष दूर करण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपण पवित्र ठिकाणी जाऊन पिंडदान करू शकत नसाल, तर त्रिपिंडी श्राद्ध अवश्य करावे. या विधीमध्ये मुख्य तीन पिंड बनवले जातात: एक सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवासाठी, दुसरा महादेव आणि तिसरा यमराजासाठी. याशिवाय एक पिंड प्रेतांसाठी आणि इतर 16 पिंड आपल्या पूर्वजांसाठी बनवले जातात. हे 16 पिंड अशा पितरांसाठी असतात ज्यांची नावे किंवा मृत्यूची तिथी आपल्याला माहित नाही, किंवा ज्यांचा मृत्यू अपघात किंवा अकाल मृत्यूने झाला आहे. यात एकूण 20 पिंड बनवून विधिवत पूजन केले जाते.
advertisement
आंधळा मागतो एक..! पण नशीब देणार छप्परफाड; 3 राशींना अनपेक्षित लाभ, काम तमाम
त्रिपिंडी श्राद्ध कधी करावे?
हे श्राद्ध कोणत्याही महिन्याच्या अमावस्या तिथीला किंवा कृष्ण पक्षातील कोणत्याही 15 तिथींना करता येते. चैत्र आणि मार्गशीर्ष महिन्याचा कृष्ण पक्ष तसेच पितृपक्ष या विधीसाठी अतिशय उत्तम मानले जातात. अमावस्येच्या दिवशी पितर पृथ्वीवर येतात, त्यामुळे या दिवशी त्यांना तृप्त केल्यास विशेष फळ मिळते.
त्रिपिंडी श्राद्ध कुठे करावे?
त्रिपिंडी श्राद्ध कधीही घरी करू नये. हे श्राद्ध नदीवर, पवित्र ठिकाणीच करावे. काशी (वाराणसी) हे या विधीसाठी सर्वोत्तम स्थान मानले जाते. महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या प्रसिद्ध ठिकाणी देखील जाऊ शकता. पितृदोषातून मुक्तता मिळाल्यावर जीवनातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
टेन्शन सोडा, इतक्या सहज होणार काम; मकर संक्रातीच्या आधीच या राशींना शुभवार्ता
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
