मोहिनी एकादशी कधी आहे?
वैदिक पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी साजरी केली जाते. ही तिथी 7 मे रोजी सकाळी 10 वाजून 19 मिनिटांनी सुरू होईल आणि 8 मे रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत राहील. उदय तिथीनुसार, मोहिनी एकादशीचा उपवास 8 मे रोजी केला जाईल.
हे उपाय नक्की करा
advertisement
तुळस : मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाखाली गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूचं ध्यान करत तुळशीला सात प्रदक्षिणा करा. असं केल्याने तुमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील आणि तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.
गोमती चक्र : जर तुम्हाला व्यवसायात अडचणी येत असतील, तर मोहिनी एकादशीला 11 गोमती चक्र आणि 3 लहान एकमुखी नारळ घ्या. ते देवघरात स्थापित करा आणि धूप-दीप लावून त्यांची पूजा करा. पूजेनंतर गोमती चक्र आणि एकमुखी नारळ एका पिवळ्या कपड्यात बांधून ऑफिस किंवा दुकानाच्या मुख्य दारावर टांगा. या उपायाने तुमचा व्यवसाय पुन्हा सुरू होईल.
केळीचं झाड : घरात सतत नवरा-बायकोमध्ये भांडणं होत असतील, तर मोहिनी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची धूप, दीप, रोळी-तांदूळ इत्यादींनी पूजा करा आणि भगवान विष्णूंना केशराने मिसळलेलं दूध अर्पण करा. काही मिनिटांनंतर ते प्रसाद म्हणून प्या. असं केल्याने नवरा-बायकोमधील संबंध मधुर होतील.
अडकलेले पैसे : जर तुमचे पैसे कुणाकडे अडकले असतील, तर मोहिनी एकादशीच्या दिवशी एक गोमती चक्र घ्या आणि संध्याकाळी अंधार झाल्यावर एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा घराबाहेर रिकाम्या जागी खड्डा खणून ते गोमती चक्र भगवान विष्णूचं नाव घेत पुरून टाका. त्या व्यक्तीने तुमचे पैसे परत करावेत, अशी देवाला प्रार्थना करा. या उपायाने तुमचे काम होईल.
हे ही वाचा : Vastu Tips For Sleeping: रात्री झोपताना डोकं या दिशेला करावं! अनेकजण करतात चूक, फायदे अनेक
हे ही वाचा : Vastu Tips: घरात आल्यावर दरवाजा मागे अडकवता कपडे? जीवनावर त्याचा असा होऊ लागतो परिणाम